बुलढाणा (प्रशांत खंडारे)- जिल्ह्यात देशी दारूचा महापूर वाहत असून प्रामुख्याने धामणगाव बढे येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे. याकडे मात्र संबंधित यंत्रणा दुर्लक्षित असून, कारवाईची मागणी उठत आहे.
धामणगाव बढे पोलीस ठाण्यांतर्गत 52 गावे व 5 बिट आहे. या पोलीस ठाण्यांतर्गत एक पोलीस चौकी चा समावेश असून धामणगाव बढे पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येक गावात देशी दारूचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पोलीस ठाण्यांतर्गत 4 देशी दारू परवानाधारकांची दुकाने आहेत, तरीही पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येक गावात देशी दारू मोठ्या प्रमाणात मिळते, ही देशी दारू येते कुठून? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तरीही पोलीस प्रशासना सह राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस ठाण्यांतर्गत मोटारसायकलने मोठय़ा प्रमाणात देशी दारूची अवैध तस्करी होत असतानाही संबंधित विभाग कारवाई करत नाही, त्यामुळे दारूचा महापूर वाहत आहे. दारूचे तस्करीसह पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ढाब्यांवरही मोठ्या प्रमाणात देशी दारूची विक्री होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
धामणगाव बढे पोलीस ठाण्यांतर्गत अनेक ठिकाणी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई, मग देशी दारूचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई का नाही? तसेस पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारू सुरू असलेल्या ढाब्यांच्या नावाखाली देशी दारूची विक्री होत असूनही अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिस प्रशासन कारवाई करत नाही.
धामणगाव बढे पोलीस ठाण्यात ५ बिट व एका पोलीस चौकीचा समावेश असून त्यात पिंपरी गवळी पोलीस चौकी, रोहिणखेड, कोर-हाळा बाजार सावरगाव, पिंपळगाव देवी या पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होते, फक्त पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन विभाग डोळे झाकून बसले आहे.