बुलढाणा (प्रशांत खंडारे) – विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी आयोजित गुन्हे परिषदेत बुलढाणा जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेऊन सण-उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था ठेवून शांतता अबाधित राखण्याचे आवाहन केले. यावेळी विशेष कामगिरीसाठी अधिकार्यांचा त्यांनी सन्मान केला. काल, २२ ऑगस्ट रोजी जयंत नाईकनवरे, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती यांची परिक्षेत्रांतर्गत बुलढाणा जिल्हा पोलीस संबंधीत गुन्हे परिषद आणि शांतता समितीची बैठक येथील पोलीस मुख्यालयात पार पडली. सदर कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बाबुराव महामुनी-अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा, डी. एस. गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर, विनोद ठाकरे, उपविपो अधिकारी खामगांव,गुलाबराव वाघ, उपविपोअ बुलढाणा, अजयकुमार मालवीय उपविपोअ देऊळगांव राजा, प्रदीप पाटील उपविपोअ मेहकर, पोनि अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. बुलढाणा तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ठाणेदार आणि शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
प्रभा हॉल येथे आगामी श्रावण महिना सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या वेळी विशेष पोलीस महानिरीक्ष नाईकनवरे यांनी उपस्थितांच्या समस्या, सूचना जाणून घेवून ऐकमेकांच्या धर्मांचा आदर ठेवून, सण उत्सव शांततेने साजरे करणेबाबत उपस्थितांना आवाहन केले. यावेळी केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार यांचे कडून गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी राष्ट्रपतीपदक प्राप्त पोनि. अशोक लांडे, प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा व मोहंम्मद असलम शेख हमीद, पोलीस मुख्यालय बुलढाणा यांचा सत्कार करण्यात आला. सदर शांतता समितीच्या बैठकीला जिल्ह्यातील सर्वधर्मीय लोकांची उपस्थिती होती. दरम्यान, पोलीस मुख्यालयातील वसुंधरा हॉल येथे गुन्हे परिषद घेण्यात आली. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नाईकनवरे यांनी जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेवून गुन्ह्यांचे निर्गतीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी प्रदिप पाटील उपविपोअ. मेहकर, श्री. विवेक पाटील परि. पोउपअधि. बुलढाणा, पोनि. अशोक लांडे, सपोनि. निलेश सोळंके, स्वप्निल नाईक, पोउपनि. सचिन कानडे स्था. गु. शा. बुलढाणा, पोनि. अशोक रत्नपारखी, सपोनि. स्मिता म्हसाये पो.स्टे. मलकापूर शहर, पोनि. सुरेश नाईकनवरे खामगांव ग्रा, पोनि. अरुण परदेशी पो.स्टे. शिवाजीनगर, पोनि.अनिल बेहरानी पो.स्टे. नांदूरा, सपोनि. नंदकिशोर काळे पो.स्टे. साखरखेर्डा, पोनि. सारंग नवलकर पो.स्टे. सायबर- बुलढाणा, पोनि. प्रल्हाद काटकर, सपोनि प्रियंका गोरे पो.स्टे. शेगांव शहर, पोउपनि प्रिया उमाळे, संजय ठाकरे अ.मा.वा.प्र.कक्ष-बुलढाणा तसेच संबंधीत शाखा आणि पो.स्टे. चे पोलीस अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
सदर गुन्हे परिषदे दरम्यान मा.वि.पो.म.नि. यांनी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जितेंद्र आडोळे, वाचक पो.अ. बुलढाणा यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोनि.अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्थागुशा बुलढाणा, जयवंत सातव पोउपअधीक्षक (मुख्या), सपोनि. निलेश सोळंके, स्वप्निल नाईक, पोउपनि. सचिन कानडे, राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडके, पोना. सतीश हाताळकर,पोकॉ. मनोज खरडे, विक्रांत इंगळे, जगदेव टेकाळे, वनिता शिंगणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार, बिनतारी संदेश विभागाचे अंमलदार यांनी विशेष प्रयत्न केले.