BULDHANAChikhaliVidharbha

रिपाइंचा (आठवले) यवतमाळ येथे मंगळवारी विदर्भस्तरीय मेळावा

– केंद्रीय मंत्री रामदास आठवले करणार प्रमुख मार्गदर्शन

बुलढाणा/चिखली (प्रतिनिधी) – भारतीय रिपब्लिकन पक्षाचा (रिपाइं-आठवले) येत्या मंगळवारी (दि.२२) विदर्भस्तरीय मेळावा यवतमाळ येथील बाळकृष्ण मंगल कार्यालय, आर्णी रोड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती बुलढाणा जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी दिली, तसेच या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने हा मेळावा महत्वपूर्ण ठरेल, असेही गवई म्हणाले.

रिपाइंचा हा मेळावा दुपारी एक वाजता सुरू होणार असून, केंद्रीय मंत्री तथा पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांचे प्रमुख मार्गदर्शन, तर प्रदेशाध्यक्ष सुधाकर तायडे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या मेळाव्यास पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राष्ट्रीय संघटक भूपेश थुलकर, प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, प्रदेश कार्याध्यक्ष बाबुरावजी कदम, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष महेंद्र मानकर हे उपस्थित राहणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी हजोरोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांच्यासह रामेश्वर वाकोडे (प्रदेश सचिव), मुरलीधर गवई (जिल्हा महासचिव), मुख्तार खॉ पठाण (जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग), बाबासाहेब जाधव (जिल्हा कार्याध्यक्ष), आशाताई वानखडे (जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा), अशोकराव वानखेडे, शरद खरात, नीळकंठ सोनुने (खामगांव), दत्ता पाटील राहणे, हिंमतराव जाधव (चिखली), आम्रपाल वाघमारे, राजेश बोर्डे, बाबुलाल इंगळे (संग्रामपूर), केशवराव सरकटे, बाळासाहेब आहिरे (मोताळा), संतोष वानखडे, (जळगाव जामोद), शैलेश वाकोडे (नांदुरा), सूरज शेगोकार (शेगाव), रामदास अडागळे (मेहकर), दिलीप इंगळे (मलकापूर), अशोक पवार (सिंदखेडराजा), समाधान सरदार (लोणार), विद्याताई इंगळे, रोशनीताई कबीरदास, शोभाताई सुरडकर आदी पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!