ChikhaliVidharbha

चिखली-देऊळगावराजा रोड झाला वाहनधारकांसाठी कर्दनकाळ!

मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही पेट्रोल पंपाच्या जवळ असलेला २०० मीटर रस्ता हा वाहन धारकासाठी कर्दनकाळ झालेला आहे. या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर वाहनाच्या रांगाच रांगा लागत असताना वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने अनेक वाहनधारक त्रस्त झालेले आहेत. पोलिस व प्रशासनाने मात्र या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष सुरू असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

चिखली ते देळगावराजा हा महामार्ग पूर्ण झालेला असताना एक ते दोन ठिकाणी हा रस्ता अपूर्ण असल्याने, पावसाळ्याच्या दिवसात अनेक वाहनधारकांना या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी दोन वर्षापासून देऊळगावमही या ठिकाणी रस्ता अपूर्ण असून, शासन कोणत्याही प्रकारचे आजपर्यंत या ठिकाणी काम केलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या या ठिकाणी वाहनधारकांना त्रास करून दोन दोन तीन तीन तास ट्रॅफिक जाम होऊन अनेक वाहनधारकांना त्या ठिकाणी ताटकळत बसावे लागत आहे, तरी प्रशासनाने योग्य खबरदारी घेऊन त्या ठिकाणी रस्ता दुरुस्तीची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!