बुलढाणा (संजय निकाळजे) – लोककवी वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्याचे अनावरण बुलढाणा शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात 15 ऑगस्ट रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते तर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, गीतकार विष्णु शिंदे त्यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.
‘माणसा इथे मी, तुझे गीत गावे, असे गीत गावे, तुझे हित व्हावे..एकाने हसावे, लाखाने रडावे, असे विश्व आता, इथे ना करावे…’ विश्व कल्याणाचा विचार मांडणाऱ्या महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०२ वी जयंती निमित्त बुलढाणा शहरात वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी ११ वाजता जयस्तंभ चौकातून कलावंतांची रॅली काढण्यात आली. त्यामध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करून कलावंत सहभागी झाले होते. त्यानंतर रॅली हुतात्मा स्मारक परिसरामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते लोककवी वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दै सकाळ माजी समूह संपादक उत्तम कांबळे हे होते.याप्रसंगी नगरपरिषद बुलढाणाचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांचे सह गीतकार विष्णु शिंदे, माजी जिल्हाधिकारी रमेश घेवंदे, विठ्ठलराव येवले, शाहीर डी आर इंगळे ,दिलीप जाधव, अमोल खरे, अमोल हिरोळे ,सुमित सरदार ,अजय बिल्लारे, समाधान घेवंदे, श्रीकांत जाधव, अनंत मिसाळ, बि ओ बोर्डे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी उपरोक्त मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
शाहीर डी आर इंगळे यांच्या संचाने स्वागत गीत सादर केल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र साळवे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश आराख यांनी केले तर सुरेश साबळे यांनी आभार व्यक्त केले. त्यानंतर विविध ठिकाणाहून आलेल्या कलाकारांनी आपली कला सादर केली तर गायकांनी वामनदादांच्या जीवन चरित्रावर गीते सादर केली. या कार्यक्रमाला कलावंत, गायकांनी त्यांच्या पारंपारिक वेशभूषा आणि वाद्य वृंदाच्या संचासह सहभाग नोंदवला. कार्यक्रमासाठी शाहीर शिवाजी लहाने, अनिल हेलोडे, प्रबोधनकार गजाननदादा गवई, देवानंद वानखेडे, गायक तथा पत्रकार संजय निकाळजे, विजय मांडकेकर, अमोल जायभाये, सुरेश अवसरमोल, कवी गायक प्रीतमकुमार मिसाळ, गणेश कदम परिश्रम घेतले.