BULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

बुलढाण्याचा ‘बालेकिल्ला’ काँग्रेसला परतच हवा!

– बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी बुलढाण्यात काँग्रेसचाच खासदार हवा : नानाभाऊ गावंड़े
– स्वातंत्र्याच्या लढाईप्रमाणेच आता जात, धर्म विसरून एकीने लढण्याची गरज : राहुल बोंद्रे

बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना गेल्या तीन पंचवार्षिकपासून येथे राष्ट्रवादी काँग्रेस येथून लढली. जिल्ह्यात आघाड़ीचा उमेदवार असताना त्याला निवड़ून आणण्यासाठीदेखील काँग्रेस कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. यामुळे मात्र काँग्रेसचे मोठे नुकसान होत आहे. बुलढाणा काँग्रेसचा बालेकिल्ला कायम ठेवायचा असेल तर येथे आता काँग्रेसचाच खासदार हवा, असे रोखठोक मत काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक तथा प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गावंड़े यांनी व्यक्त केले. तर २०१४ पासून देशात राजकीय चित्र बदलले असून, दबाब व दड़पशाहीचे राजकारण सुरू आहे. ज्यांच्या मनात तिरंगा नाही त्यांना तिरंग्यासमोर नतमस्तक व्हावे लागत आहे, असा आरोप करत हे चित्र बदलण्यासाठी तसेच, काँग्रेस व मित्रपक्षाचा उमेदवार निवड़ून येण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीप्रमाणे जात, धर्म विसरून आता एकीने लढावे लागणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.

लोकसभा निवड़णुकीच्या अनुषंगाने पक्षनिरीक्षक नानाभाऊ गावंड़े, समन्वयक दिलीप भोजराज यांनी १४ ऑगस्ट रोजी स्थानिक बाजार समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद सांधला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हााध्यक्ष राहुल बोंद्रे होते. तर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, आ. राजेश एकड़े, आ. धीरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, सरचिटणीस श्याम उमाळकर, प्रदेश सचिव रामविजय बुरूंगले, ड़ॉ. स्वातीताई वाकेकर, अ‍ॅड़ जयश्रीताई शेळके, लक्ष्मणराव घुमरे, अनंतराव वानखेड़े, मनोज कायंदे यांच्यासह आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांचेही मार्गदर्शन लाभले.
बैठकीच्या सुरूवातीला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना अभिवादन करून स्व. प्रा.हरी नरके यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी माजी आ. दिलीपकुमार सानंदा व खामगाव बाजार समिती सभापती सुभाष पेसोडेंसह सहकार्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याने जिल्हा काँग्रेसच्यावतीने पोलीस व शासनाचा निषेध करण्यात आला. मोहदरी येथील शेतकर्‍यावर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अतिदक्षतेच्या कारणास्तव केलेली अटकेची कारवाई मागे घ्यावी व जिंदाल कंपनीकड़ून शेतकर्‍यांना हक्काचे पैसे मिळावेत, यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. काँग्रेसला अनुकूल वातावरण असतानादेखील आतापर्यंत आघाडीचा उमेदवार देण्यात आला. आता लोकसभेची निवड़णूक पंजा चिन्हावर लढवावी, अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या बैठकीला काँग्रेसच्या किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष चित्रांगण खंड़ारे, तेजेद्रसिंह चव्हाण, अनिकेत मापारी, नंदु बोरे, दिलीप जाधव, मंगलाताई पाटील, शैलेश खेड़कर, प्रकाश पाटील, रिजवान सौदागर, जगन्नाथ पाटील, मोहनशेठ जाधव, राम ड़ाहाके, सतिश मेहेंद्रे, सुनील सपकाळ, शाम ड़ाबरे, प्रकाश देशमुख, तेजराव मारोड़े, अविनाश उमरकर, राजेश मापारी, साहेबराव पाटोळे, सरस्वती खाचणे, विजय काटोले, अर्जुन घोलप, पंकज हजारी, कलीमखान, कैलास सुखधाने, रवि पाटील, विनोद बेंड़वाल, कुणाल बोंन्द्रे, सुनील तायड़े, देवानंद पवार, दत्ता काकस यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.गजानन खरात यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!