Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPolitics

‘लोकसंवाद पदयात्रे’च्या माध्यमातून काँग्रेस पिंजून काढणार राज्य!

– सप्टेंबरमध्ये काँग्रेसची राज्यात लोकसंवाद यात्रा
– पदयात्रेसाठी विभागनिहाय नेते व समन्वयकांची नियुक्ती

बुलढाणा (बाळू वानखेडे) – जनतेला खोटी आश्वासने देत भाजपचे नरेंद्र मोदी सरकार केंद्रात सत्ता गाजवत असून, फोड़ाफोड़ीच्या राजकारणातून अस्तित्वात आलेले राज्यातील चाळीस खोके सरकारही अपयशी ठरले आहे. त्यामुळे देशात लोकशाही व संविधानदेखील धोक्यात आले आहे, असा आरोप करत, अशा कठीण काळात काँग्रेस मात्र जनतेसोबत आहे, असा दावा करत राज्यातील जनभावना जाणून घेण्यासाठी येत्या सप्टेंबर महिन्यात काँग्रेसच्यावतीने ‘लोकसंवाद पदयात्रा’ काढण्यात येणार असून, यासाठी प्रदेश काँग्रेसकडून काल, १० ऑगस्ट रोजी विभागनिहाय प्रमुख नेते व समन्वयकांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वड़ेट्टीवार, माजी मुख्यमंत्रीद्वय अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

विभागनिहाय सन्वयक व नेत्यांची यादी

केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील खोके सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढली असून, इडी व सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करत देशात वारंवार घड़त असलेल्या जातीय व धार्मिक दंगलीमुळे जनता भयभीत झाली असून, मनात प्रचंड चीड़ आहे, असाही आरोप करण्यात आला आहे. या कठीणसमयी काँग्रेस मात्र जनतेसोबत असल्याचा दावा करत, ३ ते १२ सप्टेंबरदरम्यान राज्यात आयोजित लोकसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून जनभावना जाणून घेणार आहेत. यासाठी विभागनिहाय प्रमुख नेते व समन्वयकांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे.

यामध्ये नागपूर विभागासाठी प्रमुख नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर पदयात्रा दौरा समन्वयक प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंड़े, अमरावती विभाग प्रमुख नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वड़ेट्टीवार तर समन्वयक प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, मराठवाडा प्रमुख नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व समन्वयक प्रदेश सरचिटणीस अभिजित सपकाळ, उत्तर महाराष्ट्र प्रमुख नेते तथा गटनेते बाळासाहेब थोरात व समन्वयकांची प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व समन्वयक प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड़, तर कोकण विभागासाठी जिल्हानिहाय नियुक्त प्रमुख नेते व समन्वयक याप्रमाणे, ठाणे जिल्ह्यासाठी नाना पटोले व प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, पालघर साठी बाळासाहेब थोरात व रामचंद्र (आबा) दळवी, रायगड अशोक चव्हाण व रमाकांत म्हात्रे, सिंधूदुर्ग विजय वड़ेट्टीवार व शशांक बावचकर व रत्नागिरी जिल्ह्यासाठी पृथ्वीराज चव्हाण व हुसेन दलवाई आदिंची नियुक्ती प्रदेश काँग्रेसकडून प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन देवानंद पवार यांनी काल, १० ऑगस्टरोजी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!