आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी – देहू मार्गावरील वेदश्री तपोवनचे भव्य दिव्य मंडपातील प्रांगणात महाविष्णुयाग अधिक श्रावण मास निमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे खजिनदार तसेच श्रीकृष्ण जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास मथुराचे उपाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या पावन सानिध्यात ३३ कुंडीय महाविष्णू यागचे आयोजन ८ व ९ ऑगस्ट रोजी करण्यात आले असल्याचे विवेक पांडे गुरुजी यांनी सांगितले.
यावेळी आळंदी देहू पंचक्रोशीतील भाविकांना धार्मिक कार्यक्रमांची सुवर्णसंधी लाभत आहे. सर्वांनी दर्शन, श्रवणाचा तसेच परिक्रमेचा लाभ घेण्यास उपस्थित राहावे असे आवाहन वेदश्री तपोवन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी दोन दिवसीय वैदिक मुखार वीरांधातून विष्णू सहस्त्रनाम ३ हजार ३०० पाठ होणार आहेत. यास परिसरातून नागरिक भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवा उद्योजक राहुल चव्हाण, पुजारी श्री पुजारी मोरे काका यांनी दिली आहे. यावेळी आचार्य अभिजित पांडे गुरुजी यांनी उपक्रमाची माहिती देत महत्त्व विषद केले. या ३३ कुंडीय यज्ञ सोहळ्यात पंचक्रोशीतील साधक, भाविकांनी सहभागी व्हावे. या मंगलमय धार्मिक परंपरा जोपासण्याचे अधिक मास मधील उपक्रमास ९० फूट रुंदी ९० फूट लांबी तसेच पाच स्तर उंच असलेल्या यज्ञ शाळा, यज्ञ कुंड मंडपाचे काम सुरु करण्यात आले असून ते अंतिम टप्प्यात मुकेश दंडवते गुरुजी, भगवान जोशी गुरुजी यांनी माहिती दिली. काम परिश्रम घेत आहेत. या ठिकाणी ३३ कुंडीय महाविष्णू याग होत आहे. यज्ञ कुंड तयार करण्यात आले असून पौराणिक पद्धतीने मंडपाचे प्राचीन स्वरूपातील लूक देण्यात आला आहे. यासाठी राजस्थान येथील कारागीर हरिशकुमार बंजारा, भरत कुमार बंजारा यांचे देखरेखी खाली काम सुरु आहे. आळंदी परिसरात नागरिकांचे माहितीसाठी जनजागृती करण्यात येत असल्याचे युवा उद्योजक राहुल चव्हाण यांनी सांगितले.