ChikhaliCrimeVidharbha

चिखली शहरात अवैध धंद्यांचा धुमाकूळ! कोणत्या पोलिस अधिकार्‍याचे अभय?

– कष्टकरी मजूर, शेतकरी, कामगार या अवैध धंद्यापायी देशोधडीला लागले!

चिखली (महेंद्र हिवाळे) – शहरात अवैध धंदे खुलेआम सुरू असून, या अवैध धंद्यांना पोलिसांचे आशीर्वाद आहेत का, असा संतप्त सवाल चिखलीवासीय करत आहेत. व्हिडिओ गेम, वरली-मटका, सट्टा, अवैध दारूविक्रे व वेश्या व्यवसायाला चिखलीत उधाण आले असून, अनेक कष्टकरी कामगार या अवैध धंद्याने उद््ध्वस्त केले असून, अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या अवैध धंद्याचे मासिक कलेक्शन कोण घेते? याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी खासगीरित्या चौकशी करून, संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. या संदर्भात भीमसेना सामाजिक संघटनेदेखील अप्पर पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले असून, या गंभीर प्रकाराबाबत अवगत करून दिले आहे. तसेच, हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.

चिखली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, श्री संकट मोचन हनुमान मंदीर मागील परिसर, मार्वेâट परिसर अशा अनेक ठिकाणी सर्रासपणे वरली व्यवसाय जोमात सुरु आहे. दररोज कोणत्या न कोणत्या कारणास्तव डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका परिसरात अवैध वरली व्यवसायामुळे भांडणे चालू असतात. गेल्या अनेक महिन्यांपासून भीमसेना सामाजिक संघटना तथा शहरातील काही पक्ष, संघटना यांनी अनेकवेळा अवैध वरली व्यवसाय संदर्भात निवेदन देवूनसुद्धा पोलीस प्रशासनाचे या अवैध धंद्यांकडे डोळेझाक चालवली आहे. शहरात अवैध धंद्यांसोबतच व्हिडिओ गेमदेखील सर्रासपणे सुरु आहे. सदर अवैध वरली व्यवसायापायी शेकडो संसार उद्ध्वस्त झाले असून, गोरगरीब, मजूर, कष्टकरी हे अवैध वरली व्यवसायाच्या आकड्यावर तसेच व्हिडिओ गेमवर आपले मोलमजुरीचे पैसे लावतात. परिणामी, गोरगरीब जनतेच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. त्याचप्रमाणे कास्तकार हे शेतीमालाचे पैसे अवैध वरली, व्हिडिओ गेम यामध्ये बरबाद करतात. परिणामी, कर्जबाजारी होवून आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत. अवैध वरली, व्हिडिओ गेम किंग ह्या
घामाच्या पैशावर लाखो रुपये कमवीत आहेत. ही सारी भयावह स्थिती टाळण्यासाठी चिखली शहरातील अवैध वरली, व्हिडिओ गेम संपूर्णपणे बंद होणे गरजेचे आहे, व कायद्याचा धाक निर्माण होणे गरजेचे आहे. आजरोजी कायद्याचा धाक ह्या अवैध वरली व्यवसाय करणार्‍यांवर राहिलेला असून, त्यांना कोणत्या पोलिस अधिकार्‍याचे अभय आहे, याचा तपास होणे गरजेचे आहे.


अवैध धंदे बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन – भीमसेना संघटनेचा इशारा

चिखली शहरातील अवैध वरली व्यवसाय त्वरीत बंद करा, अन्यथा भीमसेना सामाजिक संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा अप्पर पोलिस अधीक्षक महामुनी यांना भेटून व निवेदनाद्वारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई मनिष गवई यांनी दिला आहे. चिखली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, श्रीसंकट मोचन हनुमान मंदीर मागील परिसर, मार्वेâट परिसर अशा अनेक ठिकाणी सर्रासपणे अवैध वरली व्यवसाय जोमात सुरु आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओ गेमदेखील शहरामध्ये सर्रासपणे सुरु आहे. हे व्यवसाय तातडीने बंद झाले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारादेखील पोलिसांना यावेळी देण्यात आला. यावेळी चिखली शहरातील अवैध धंदे ह्याकडे जातीने लक्ष देवून त्वरीत बंद करू, असे आश्वासन अप्पर पोलिस अधीक्षकांनी दिले आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!