Breaking newsHead linesMaharashtraPachhim MaharashtraPune

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

पुणे : लोकमान्य टिळक यांची आज 103 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त प्रतिष्ठित, समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचा लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मान करण्यात येतो. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी पुणेकर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी जेव्हा शरद पवारांच्या जवळ पोहोचले तेव्हा पवारांनी हस्तांदोलन करीत मोदींचं स्वागत केलं. यावेळी क्षणभर दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली अन् शरद पवारांनी हसून मोदींच्या पाठीवर थाप टाकली. बाजूला उभे असलेल्या सुशीलकुमार शिंदेंच्या चेहऱ्यावरदेखील हास्य फुलले होते. दरम्यान, मोदींच्या या दौऱ्यादरम्यान काँग्रेससह अनेक सामाजिक संस्थांकडून मोदींच्या दौऱ्याचा निषेध करत आंदोलन केले जात आहे. विरोधकांकडून पंतप्रधानांना मणिपूरच्या मुद्द्यावर काळे झेंडे दाखवण्यात आले.

काशी आणि पुणे या दोघांची विशेष ओळख आहे. विद्धवता इथे अमर आहे. पुणे विद्धवतेची ओळख. इथे हा सन्मान होणं हा आयुष्यातील समाधानाच क्षण. पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. केसरी आणि मराठाच्या माध्यमातून टिळकांनी इंग्रजांना घाम फोडला. गणेशोत्सव, शिवजयंती यामध्ये टिळकांच मोठ योगदान आहे, असं शरद पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!