AalandiHead linesPachhim Maharashtra

तीर्थक्षेत्रांत देवदर्शनास स्वयंशिस्तीचा शेगाव पॅटर्न वापरावा : उपसभापती नीलम गो-हे

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्य परिसरातून तीर्थक्षेत्र आळंदी सह इतरही ठिकाणीचे तीर्थक्षेत्रात मोठ्या प्रमाणात भाविक देवदर्शनास येत असतात. तीर्थक्षेत्रात देवदर्शन, स्वच्छता होण्यास सेवाभाव जोपासत स्वयंशिस्तीचा शेगाव पॅटर्न वापरला जावा, असे आवाहन विधानपरिषद उपसभापती निलमताई गो-हे यांनी केले.

अधिक श्रावण महिन्या निमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आळंदीत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. मंदिरातील पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात देखील श्रींचे दर्शन घेत मंदिरातील व्यवस्थापन व पत्रकार यांचेशी समवेत संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माऊली मंदिराचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, माऊली दास महाराज, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, उद्योजक राहुल चव्हाण, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर, संकेत वाघमारे, सचिन महाराज शिंदे, माऊली गुळुंजकर, मंगलाताई हुंडारे, संगिता फफाळ, निर्मला अकोटकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी आळंदी येथे माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. पत्रकारांच्या वतीने संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी आळंदी मधील समस्यांत इंद्रायणी मातेच्या जलप्रदूषणा विषयी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत चालू असलेल्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सिद्धबेट यासाठी जवळपास ३७ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र काम उर्वरित आणि प्रलंबित असल्याचे विचारले.

यावर उपसभापती गो-हे म्हणालया, अलीकडेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली. गेल्या काळात मागील शासनाने तीर्थक्षेत्र विकास साठी तेराशे ते चौदाशे कोटी रुपये खर्च केल्याचे मला समजले. परंतु सदर काम हे जिल्हा नियोजन समिती मार्फत महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच तालुका स्तरावर केले जाते. त्यावेळी ज्याप्रमाणे त्याच्यावर देखरेख व्हायला पाहिजे तशी देखरेख होत नाही. त्यामुळे सदर कामांचे मोठ्या स्वरूपातील बिल निघूनही त्या पद्धतीने काम झालेले नसते असं लक्षात आले आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा केली त्यावेळी यापुढे यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचा प्रत्येय नुकताच पंढरपूर येथे झालेल्या आषाढी एकादशी मध्ये आषाढी एकादशीच्या आधी मुख्यमंत्र्यांनी विकास कामांचा स्वतः त्या ठिकाणी जाऊन आढावा घेतल्याचे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. पहिलेच मुख्यमंत्री आहेत की तीर्थक्षेत्र विकासामध्ये स्वतः जातीने लक्ष घालतात. त्याच प्रमाणे वारकऱ्यां संबंधी विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वतः जातीने लक्ष घालण्याचं काम सुरू आहे. मी सुद्धा आळंदी संबंधी विविध समस्यां बाबत पाठपुरावा करून भामा आसखेडच्या धरणातील पाणी बंधिस्त पाईप लाईन मधून देण्यासाठी तत्कालीन आमदार गोरे तसेच इतर विविध समस्यां बाबत प्रयत्न करून ते सोडवण्याचे काम केलेले आहे. आपण आत्ता जो दर्शन बारीचाही प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये जागेसंबंधी त्याविषयी असा घाईने निर्णय घेता येणार नाही. त्यासंबंधी सर्व बाबींची चौकशी करून त्यावर उपाययोजना करता येईल. त्या म्हणाल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणाच्या चपला धर्मस्थळाच्या बाहेर रहाव्या या संकल्पनेतून स्थानिकांनी यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून गजानन महाराज शेगाव संस्थान प्रमाणे स्वयंसेवका मार्फत कामकाज केल्यास अतिशय उत्तम राहील. आळंदी हे माऊलींचं स्थान असल्यामुळे ज्याप्रमाणे विकास व्हायला पाहिजे तसा झालेला नाही तो अधिक विकास व्हावा यासाठी आपण सर्वानी मिळून प्रयत्न करू असे सांगितले. विकास आराखड्यास गती देण्यासह इंद्रायणी नदी प्रदूषण, आळंदी सिद्धबेट विकास आदीं साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समवेत चर्चा केली जाईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी आळंदी शिवसेनेतर्फे त्यांचे स्वागत राहुल चव्हाण, उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, सचिन शिंदे आदीनी केले. माऊली दास महाराज यांनी आळंदी सिद्धबेट विकास काम बाबत उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे शी संवाद साधला. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी राहुल चव्हाण,नितीन गोरे, प्रकाश वाडेकर, अविनाश राळे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!