ChikhaliHead linesMEHAKARVidharbha

चिखली, मेहकरात भिडे उर्फ कुलकर्णीविरोधात काँग्रेसची तीव्र आंदोलने!

चिखली/मेहकर (महेंद्र हिवाळे/अनिल मंजुळकर) – क्रांतीसूर्य महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू, शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी आक्षेपार्ह व अश्लाघ्य वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करत चिखलीत काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच, तहसीलदारांमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले. तसेच, मेहकर येथेदेखील तहसील चौकात काँग्रेसच्यावतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महापुरूषांचा अपमान करणार्‍या भिडे उर्फ कुलकर्णी यांचा निषेध नोंदविण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा विकृती धारण केलेला व्यक्ती वादग्रस्त विधानाने समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य करत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात केलेले अवमानकारक विधान देशवासीयांना अस्वस्थ करणारे आहे. यापूर्वी अनेकदा मनोहर भिडे यांनी केलेली विधाने वादग्रस्त ठरली आहे. मात्र वारंवार वादग्रस्त विधाने करून देशात व राज्यात सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार्‍या या व्यक्तीला कोण पाठीशी घालते? किंवा कोण पाठराखण करते? हे न समजण्याइतकी देशातील जनता दुधखुळी नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांना धर्म व राजद्रोही म्हणणारा, मी दिलले आंबे खाल्याने मुलं होतात, असे सांगून मूर्खपणाची पराकाष्ठा करणारा, बलात्कारी आसारामबापूच्या सुटकेसाठी प्रार्थना करणारा, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांची तुलना करणारा, वैद्यकीय अधिकार्‍यांविरूध्द अपशब्द वापरणारा, १५ ऑगस्ट या स्वातंत्रदिनाला काळा दिवस संबोधनारा, तसेच स्वातंत्र हे भिकेत मिळाले असून, स्वातंत्र संग्रामातील क्रांतीकारांचा अपमान करणारा, तिरंगा राष्ट्रध्वज मानू नका, असे म्हणून देशासाठी शहीद होणार्‍या शहीदांचा तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान करणारा, मुस्लीमद्वेष करत महाराष्ट्रातील हजारो युवकांचे आयुष्य बरबाद करणारा, दंगलखोर मनुवादी भिड़े याचा चिखली तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करतो. भिडे याने राज्यातील व देशातील जनतेची जाहीर माफी मागावी तर सरकारने तात्काळ कारवाई करून देशद्रोही भिडेला तात्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. तसेच, भिडेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनप्रसंगी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अतहरोद्दीन काझी, विष्णू पाटील कुळसुंदर, डॉ. मोहमंद इसरार, भाई प्रदीप अंभारे, कुणाल बांद, रामभाऊ जाधव, सचिन बांद, नगरसेवक रफिक सेठ, हाजी राउफ भाई, गोकुळ शिंगणे, राजू रज्जाक, दीपक थोरात, ज्ञानेश्वर सुरूशे, शिवनाराण म्हस्के, रामदासभाऊ मोरे, विजय पाटील शेजाळ, राहुल सवडतकर, शहजादअल्ली खान, प्रदीप पचरवाल, नीलेश अंजनकर, गजानन परिहार, अ‍ॅड. विलास नन्हई, कैलास खराडे, साहेबराव पाटील, लक्ष्मण आंभोरे, डॉ. अमोल लहाने, पवन गवारे, साहेबराव पाटील, खलील बागवान, अ‍ॅड. प्रशांत देशमुख, अशोक किसनराव पडघान, जाकीर भाई, प्रकाश सपकाळ, अकिल भाई, अजाबराव देशमुख, डिगांबर देशमाने, मलीक जमदारी, रामधन मोरे, भास्कर चांदार, प्रदीप मोरे, देविदास लोखड, समीर खान, एन. टी. भुसारी, साहेबराव आंभोरे, शेख अजु, शकील भाई, संजय गिरी, शुभम बुरकुल, जितू राणा, अमोल लहाने, समाधान भटकर, प्रकाश राठोड, अक्रम बागवान, लक्ष्मण भिसे, आकाश काकडे, तौसीफ शेख, बबलू शेख, अक्तर काझी, साजीद शेख, पंजाबराव पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दुसरीकडे, मेहकरमध्येदेखील तहसील चौकात काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे, महात्मा फुले अमर रहे, मनोहर भिडे मुर्दाबाद, अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आल्या. यावेळी लक्ष्मणदादा घुमरे, कासमभाई गवळी, डिंगाबर मवाळ, वसंतराव देशमुख, शैलैश सावजी, देवानंदभाऊ पवार, अलिमभाइ ताहेर, विनायक टाले, डॉ.भरत आल्हाट, किशोरदादा गवई, अलियारखान, मुजिब कुरेशी, नीलेश मानवतकर, नीलेश सोमन मुजिबभाई खान, किशोर धोडगे, प्रा. ओम गजभिए, दिलिप बोरे, वामन मोरे, भूषण काळे, राजुभाऊ गायकवाड, सागर शिंदे, संगीता खरात, अलकाताई लंबे, लाडताई, विमल माने, विजय वायाळ, सुमित धोटे, विजय हिवाळे, सद्दाम गवळी, मनोज गोरे, मुजाहिद कुरेशी, विजय देव्हडे, शेषराव लंबे, बंडू आंधळे, सचिन कानोडजे, तुकाराम चव्हाण, सचिन गाडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

लोणार तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने स्थानिक बसस्थानक चौकात संभाजी भिड़े उर्फ मनोहर कुलकर्णी यांच्या प्रतिमेला जोड़े मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष राजेश मापारी, गजानन खरात, साहेबराव पाटोळे, शहराध्यक्ष शेख समद, प्रकाश धुमाळ, अनिकेत मापारी, शांतीलाल गुगलीया, माजी सभापती चिभड़े मामासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———-

https://breakingmaharashtra.in/sambhaji_bhide_khamgaon_sabha/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!