BULDHANAVidharbha

शाळा व शासकीय निमशासकीय कार्यालयांत तंबाखूचे व्यसन करणार्‍यांची शोधमोहीम

– वेळ पडल्यास पोलिसांची मदत घ्या – जिल्हाधिकारी

बुलढाणा (संजय निकाळजे) – भारत देश हा तरुणाचा देश म्हणून ओळखला जातो आहे. परंतु आज भारतात १३ ते १५ वयोगटातील १४ टक्के विद्यार्थी तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थांच्याआहारी जात आहे. असे दिसून येत आहे.जागतिक संघटनेच्या सर्वेक्षणानुसार ५ सेंकदाला एक मुल तंबाखूच्या आहारी जात आहे. दरवर्षी जगात ५५ लाख लोक तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने मृत्यू मुखी पडतात ही खूप दुर्दैवी बाब आहे. त्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सलाम मुंबई फाऊंडेशन व कृषीसमृद्धी मल्टीपर्पज फाऊंडेशन बुलढाणा अंतर्गत राबविण्यात येणार्‍या तंबाखू मुक्त शाळा करणे गरजेचे आहेच, जेणेकरून लहान मुले तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहतील. त्याच बरोबर शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अनेक कर्मचारी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थचे सेवन करून असतात, त्याबाबत शासकीय निमशासकीय कार्यालयात जावून तंबाखूचे व्यसन करणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांचा शोध घेवून धडक मोहीम राबवा, व यासाठी पोलीस मदत लागत असेल तीसुद्धा घ्या, पण ही कारवाई कलम ४ (कोटपा) अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान प्रतिबंध कायदा २००३ अंतर्गत झाली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ.तुम्मोड यांनी केले.

सलाम मुंबई फाऊंडेशन व कृषीसमृद्धी मल्टीपर्पज फाऊंडेशन बुलढाणा ह्या सेवाभावी संस्था राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा व शिक्षण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यासोबत तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. चिखली, लोणार आणि शेगाव तालुक्यामधील मधील काही मोजक्याच शाळा तंबाखू मुक्त होण्यासाठी बाकी आहे. सदरहू तालुके १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी तंबाखू मुक्त करावे व उर्वरित तालुके सप्टेंबर अखेर पर्यत पूर्ण करण्याबाबत सूचित केले .तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सलाम मुंबई फाऊंडेशन व कृषीसमृद्धी मल्टीपर्पज फाऊंडेशन बुलडाणा या संस्थेची मदत घेवून जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी पुढाकर घ्यावा, असे सांगितले. या कार्यक्रमामध्ये डॉ.जुनेद व डॉ.लता बाहेकर यांनी आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती दिली. सदरहू बैठकीला अजिनाथ मोरे, जी.वसावे, हरी पवार, डॉ.प्रशांत मेहेत्रे ,एस.बी.चव्हाण, अर्चना आराख ,लक्ष्मण सरकटे , महेंद्र सोभागे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!