BULDHANAKhamgaonVidharbha

‘श्रीं’च्या पालखीसोबत पूरग्रस्तांसाठीही मदतीचा हात पुढे करा!

– केलेले दान गरजूंपर्यंत पोहोचविण्याची दिली ग्वाही

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – दरवर्षी खामगाव ते शेगाव दरम्यान श्रींच्या पालखीतील भाविकांना अन्नदान करण्यासाठी अनेक हात पुढे येतात. पालखीसोबतच आता संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील पूरग्रस्तांनाही अन्नदानासोबत कपड़ेही दान करा, किंवा अन्नधान्याची कीटही दिली तरी चालेल, आम्ही ते गरजूपर्यंत पोहोचवू, असे भावनिक आवाहन तरूणाई फाऊंड़ेशन खामगाव यांनी केले आहे.


दानदात्यांनी मंजितसिंग शिख ७५८८०८०११५, राजेन्द्र कोल्हे ७५८८०८०११३, अविनाश सोनटक्के ८१४९५५९०८१ व महेन्द्र बनसोड़ ९६०४९७८८९९ यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


श्रीसंत गजानन महाराज यांची पालखी खामगावात आल्यावर खामगाव ते शेगावदरम्यान वारकरी व भाविकांना अन्नदान करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावतात. जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात २२ जुलै रोजी सकाळी चार वाजता ढगफुटीसदृश प्रचंड पाऊस पड़ून नदी, नाल्यांना महापूर आला. अनेक गावात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे या आपदग्रस्तांना मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे पालखी सोबतच पूरग्रस्तांनाही अन्नदान व कपड़ेसुध्दा दान देणे गरजेचे आहे. यासाठीसुध्दा दात्यानी पुढे यावे, तुमचे दान आम्ही गरजूपर्यंत पोहोचवू, असे भावनिक आवाहन तरूणाई फाऊंड़ेशन खामगाव यांनी केले आहे.  दरम्यान, दानशूर लोकांनी दिलेले कपड़े आज जळगाव जामोद व इतर गावांतील आपदग्रस्तांना वाटप करणे सुरू असल्याचे तरूणाई फाऊंड़ेशनचे मनजीतसिंग शिख यांनी कळवले आहे.


बुलढाण्यातील संग्रामपूर,  जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा त्यासाठी महसूल विभागाने व प्रशासनाने रस्त्यावर उतरत पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. एकट्या संग्रामपूर तालुक्यात ४०,००० हेक्टर वरील पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!