Breaking newsHead linesWomen's WorldWorld update

सीमा हैदर एटीएसच्या ताब्यात; गुप्तहेर असल्याचा संशय बळावला!

नवी दिल्ली (आवेश तिवारी) – पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेली महिला सीमा हैदर हिला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएएस) ताब्यात घेतले असून, तिच्यासह तिच्या चार मुलांना व कथित प्रेमी सचीन मीणा यालादेखील ताब्यात घेऊन एटीएसचे पथक गोपनीय ठिकाणी तिची चौकशी करत आहे. भारतीय गुप्तचर संस्था आयबीला सीमा हैदर हिच्याबाबत पाकिस्तानातील सर्व माहिती प्राप्त झाली असून, तिचे काका पाकिस्तानी लष्करात सुभेदार तर तिचा भाऊदेखील पाकिस्तानी लष्करात तैनात आहे. शिवाय, सीमा ही गुप्तहेर असल्याची खात्री आयबीला पटली आहे. एटीएसच्या पथकाने सीमाला ग्रेटर नोएडा येथील तिच्या प्रेमीच्या घरातून ताब्यात घेतले आहे.

सीमा हैदर हिने तिचा भाऊ पाकिस्तानी लष्करात भरती होण्याची तयारी करत असल्याचे सांगितले होते. परंतु, वास्तवात तो पाकिस्तानी लष्करात तैनात आहे, तसेच तिचे काकाही लष्करात सुभेदार पदावर कार्यरत आहे. गुप्तचर संस्था आायबीने सीमा हैदर हिची सर्व माहिती काढली असून, ती गुप्तहेर असल्याची जवळपास खात्री सर्व यंत्रणांना पटली आहे. त्यामुळे तिचा पासपोर्ट ताब्यात घेऊन तो पुन्हा तपासला जात आहे. तसेच, तिच्या मोबाईलचे कॉल डिटेल्सही तपासले जात आहेत. नोएडा येथील सीमा व सचिन मीणा यांच्या घरी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, त्यांच्या कुटुंबीयांनादेखील या दोघांना कुठे नेण्यात आले, याची कल्पना नाही. विशेष म्हणजे, सचिनच्या कुटुंबीयांनी सचिनशी या लफड्यामुळे संबंध तोडलेले आहेत. सीमा हैदर हिचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी काही संबंध आहेत का, याची सखोल चौकशी आयबी व एटीएस करत आहेत.


सीमा हैदर ही पाकिस्तानी मेजर सामिया रेहमान असल्याचा दाट संशय!

सीमा हैदर ही विवाहित पाकिस्तानी महिला असल्याचे भासवत असली तरी, ती पाकिस्तानी लष्करातील मेजर सामिया रेहमान असल्याचा दाट संशय यंत्रणांना आहे. तसेच, ती काही तरी खास मिशनवर भारतात वेशांतर करून आली असावी, असाही संशय आहे. चर्चेतील माहितीनुसार, सीमा हैदर उर्फ सामिया रेहमान ही पाकिस्तानी लष्करात मेजर पदावर कार्यरत असून, नुकतीच ती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयमध्ये दाखल झाली आहे. भारतातील साध्या भोळ्या सचिन नावाच्या युवकाला प्रेमजाळ्यात अडकवून ती काही खास मिशनवर भारतात आलेली आहे. तिने तिचे काका पाचवी-सहावी शिकलेले आहेत, असे सांगितले होते. वास्तवात, ते पाकिस्तानी आर्मीत सुभेदार पदावर कार्यरत आहेत. तसेच, सीमा उर्फ सामिया ही उत्तम इंग्रजी व हिंदी बोलते. तसेच, तिला कॉम्पुटर, एण्ड्रॉईड मोबाईल, सोशल मीडिया वैगरे चांगल्याप्रकारे हाताळता येते. तिने जे चार मुलं स्वतःचे म्हणून भारतात आणले आहेत, ते तिचे नाहीत. अशीही माहिती यंत्रणांच्या हाती लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!