ChikhaliVidharbha

पळसखेड दौलत, चांदई येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखा स्थापन

चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील पळसखेड दौलत व चांदई येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखांची स्थापना करण्यात आली. काल (दि.११) दिवसभर चांगला पाऊस तालुक्यात झाला. भरपावसांत या शाखांची स्थापना झाली असून, समतेचे राज्य आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन याप्रसंगी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकसिंह सुरडकर यांनी केले.

पळसखेड दौलत व चांदई येथे मंगळवारी वंचित बहुजन आघाडी शाखा स्थापन करण्यात आली. शाखेच्या नामफलकाचे अनावरण अशोकसिंह सुरडकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, की वंचित बहुजन आघाडी पक्ष हा सर्व जाती धर्मांच्या वंचितांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. खराब रस्ते, पाणीप्रश्न आदींसह वंचित नागरिकांचे प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांची कामे होत नसतील तर त्यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्ष आंदोलन करेल, असा इशाराही सुरडकर यांनी यावेळी दिला.
यावेळी तालुका अध्यक्ष संजय धुरंधर, माजी तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष संजय जाधव, तालुका सचिव जितु निकाळजे, महेंद्र हिवाळे, प्रवक्ते प्रा. मिलिंद मघडे, माजी तालुकध्यक्ष अर्जुन बोर्डे, माजी सरपंच किशोर जाधव, मंगेश जाधव, शाखाध्यक्ष सुरज इंगळे, ग्रामपंचायत सदस्य नीलेश जाधव, शांताराम आराख, शाखाध्यक्ष विजय आराख, मनोहर खराडे, शाखा उपाध्यक्ष दीपक आराख यासह महिला व ग्रामस्थांची उपस्थिती होती. गावातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले तर आभार भारत आरख यांनी मानले.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!