पाचोड (विजय चिडे) – रासायनिक खतांचे वाढते दर तसेच खतटंचाई त्याबरोबरच वाढती महागाई यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, त्यातच पाचोडमध्ये दहा-सव्वीस सव्वीस खतांची टंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन उशीरा झाले मात्र रिमझिम झालेल्या पाऊसावर शेतकऱ्यांनी शेतामध्ये कपाशी तूर व इतर पिकांची लागवड केली. बारा दिवसाच्या खंडानंतर पाचोड परिसरातील पावसाने रिमझिम पडत पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांनी पिकासाठी खते देण्याची सुरुवात केली असतानाच, पाचोड येथे खतांची टंचाई निर्माण झाली असून, दहा-सव्वीस सव्वीस खत हवे असेल तर इतर खते घ्यावे, असे कृषी सेवा केंद्राचे करून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गोची होत असून खत मिळण्यास अडचणी येत आहे.
सध्या कृषी सेवा केंद्रामध्ये शेतकऱ्यांची खते खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड असून, या काळामध्ये कृषी सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांना असे तुघलकी फर्मान बजावत आहे. यां दुकानदारांना आळा घालण्यासाठी कृषी विभाग असतो. परंतु पैठण तालुक्यातिल कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पहावयास मिळत आहे. मागील दोन वर्षापासून कोरोणाच्या पार्श्वभूमीवर देखील शेतकरीवर्ग हा पुन्हा जोमाने खरीप हंगामाची सुरुवात केली असून शेतकऱ्यांनी थोडेसे उशिरा बी-बियाणे खरेदी सुरुवात केली आहे. परंतु जे बी-बियाणे शेतकऱ्यांना हवे असते दुकानदाराकडून संपल्याचे दाखवला जातो. दुकानदार यांच्याकडे कोणत्या कंपनीचे बि-बियाणे आहेत व किती उपलब्ध आहे, तसेच रासायनिक खता साठा किती उपलब्ध आहे. याची दर्शनी भागात फलक लावणे गरजेचे आहे. परंतु असे पैठण तालुक्यातिल पाचोड मधील अनेक कृषी दुकान मध्ये फलक व उपलब्ध साठा किती आहे हे लावत नाही.
तालुका कृषी विभागाकडून नावापुरताच आढावा बैठका घेतल्या जात आहे. दुकानांमध्ये कृषी अधिकारी बसलेले असताना देखील त्यांना दुकानांमध्ये न लावलेली दर्शन फलक दिसून येत नाही. जर कृषी अधिकारी कृषी केंद्राचालका सोबत लागेबांधे ठेवत असेल तर शेतकऱ्यांनी तक्रार करायची कुणाकडे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर पडला आहे. शेतकऱ्यांकडे कृषी विभागात जर लक्ष देत नसेल तर शेतकऱ्यांकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडत आहे.
शुक्रवारी पाचोड मधील एका शेतकऱ्याने दहा सव्वीस सव्वीस खत भेटत नसल्याचे पैठणचे तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांना सांगितले असता, ते पाचोड येथील काही कृषी दुकानात जाऊन पाहणी करुन आले. त्यानंतर सदरील प्रकरणात कृषी अधिकारी शेतकऱ्यांस दूरध्वनीवरून संपर्क साधून असे की, तुम्ही दुकानदाराकडे जाऊन दूरध्वनी लावून द्या मी त्यास खत देण्यास सांगतो, असे तुघलकी फर्मान देऊन कृषी सेवा केंद्र चालकांना पाठीमागे घालण्याचे काम कृषी अधिकाऱ्यांनी करत आहेत. तेव्हा याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार करायची कोणाकडे ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
————-