लोकनेते मारूतराव घुले पाटील यांच्या स्मृतीस ज्ञानेश्वर उद्योग समुहाची आदरांजली
नेवासा (ब्रेकिंग महाराष्ट्र) – साखर कारखाना व जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत करून लोकनेते मारुतराव घुलेपाटलांनी शेतकर्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त हभप. शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांना २०व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात हभप. देशमुख महाराज बोलत होते.
प्रारंभी श्रीक्षेत्र ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख, कारखाना व उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, .देसाई देशमुख, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील, संचालक काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काशिनाथ नवले, विशेष लेखापरीक्षक राजेंद्र देशमुख, राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे आदींनी स्व.घुले पाटील यांचे स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
———–