Breaking newsHead linesMetro CityMumbaiPolitical NewsPolitics

मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष दिल्लीत!

– विधानसभा अध्यक्षांनी घेतली संरक्षणमंत्री, भाजप अध्यक्षांची भेट
– मंत्रिमंडळ विस्तार, राष्ट्रपती निवडणूक आणि आगामी रणनीतीबाबत चर्चा

नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या ( दि. ९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तर आज त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाली आहे. दुसरीकडे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेदेखील दिल्लीत असून, त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटी घेतल्या.

या भेटींचा तपशील हाती आला नसला तरी, राष्ट्रपती निवडणूक, राजकीय रणनीती व राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याबाबत चर्चा होत असल्याचे सांगण्यात आले. कुणाला कोणते मंत्रिपद द्यायचे याची एक यादी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत फायनल झालेली आहे. ती यादी सद्या शिंदे यांच्या खिशात आहे. या यादीवर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे मोदी-शाह यांच्याशी चर्चा करत आहेत. फडणवीस हेदेखील दिल्लीत आहेत.
शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद देण्यात आल्यामुळे त्यांना कमी मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असून, गृहमंत्रीपदासह २५ ते २६ मंत्रिपदेही भाजपला व उर्वरित मंत्रिपदे अपक्षांना देण्यात येणार असून, ही यादी शिंदे-फडणवीस यांच्या पातळीवर निश्चित झालेली आहे. आज हे दोन्ही नेते अमित शाह यांना भेटले व चर्चा केली.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!