नवी दिल्ली (प्रतिनिधी) – भीम आर्मी या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तरप्रदेशातील देवबंद परिसरात कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. ते दिल्लीहून सहारनपूरमधील छुटमलपूर येथील आपल्या घराकडे जात होते. हरियाणाची नंबर प्लेट असलेल्या एका कारमधील अज्ञात हल्लेखोरांनी चंद्रशेखर यांच्यावर चार राऊंड फायर केले. या गोळीबारात चंद्रशेखर यांच्या कारच्या काचा फुटल्या व एक गोळी त्यांच्या पोटाला चाटून गेली. या हल्ल्यात ते बालंबाल बचावले असून, या घटनेनंतर उत्तरप्रदेशात भीम आर्मीचे सदस्य आक्रमक झाले होते. देवबंद येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना सहारनपूर येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाबाहेर त्यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली असून, हल्लेखोरांचा कसून शोध सुरू केला होता.
चंद्रशेखर आझाद हे देवबंद येथे त्यांच्या संघटनेचे सदस्य अॅड. अजय यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. काही दिवसांपूर्वीच अॅड. अजय यांच्या आईचे निधन झालेले आहे. ते या वकिलाच्या घरातून बाहेर पडत नाही तोच एका कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रशेखर यांच्या दिशेने गोळीबार केला. एकूण चार राऊंड फायर करण्यात आले. परंतु, सुदैवाने एक गोळी चंद्रशेखर यांच्या पोटाला चाटून गेल्याने ते बालंबाल बचावले. या घटनेचा भीम आर्मीने तीव्र शब्दांत निषेध केला असून, उत्तरप्रदेशात दलित व मुस्लीम नेत्यांना संपविण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याचा आरोप संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गौतम यांनी केला आहे.
आज़ाद समाज पार्टी के अध्यक्ष चन्द्रशेखर आज़ाद पर जानलेवा हमला, सहारनपुर के देवबंद में कार सवारों ने चलाई गोली। चन्द्रशेखर को छू कर निकली गोली..#chandrashekharAzad #UttarPradesh #bhimarmy pic.twitter.com/xgTmz2Uuz2
— Dalit Times | दलित टाइम्स (@DalitTime) June 28, 2023