बुलढाणा/मेहकर (जिल्हा प्रतिनिधी) – पंढरीच्या विठू माऊलीच्या दर्शनाची ओढ आता सर्वांनाच लागली असून, पावले आपोआप पंढरपूरकड़े वळत आहेत. विशेष म्हणजे, उन्ह व पावसाची तमा न बाळगता लाखोच्या संख्येने भाविक विठ्ठलचरणी लीन होण्यासाठी जात आहेत. अशाच भाविकांनी खचाखच भरलेल्या शेगाव ते पंढरपूर एस.टी.बसचे आज, २८ जूनरोजी मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील बसथांब्यावर सर्वधर्मीय समाज बांधवांनी मनोभावे उत्स्फुर्त स्वागत केले.
पंढरपूर केवळ तीर्थक्षेत्रच नाही तर भाविकांचे माहेरघरदेखील आहे. पंढरपूरला वर्षातून चार यात्रा भरतात. यामध्ये आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळेच लाखो भाविकांचा ओढा पंढरपूरकड़े असतो. अशाच पंढरपूर जाणार्या भाविकांनी खचाखच असलेल्या शेगाव ते पंढरपूर एस.टी.क्र. एमएच ४०- ५३९७ चे मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील बसथांब्यावर नारळ व फटाके फोड़ून सर्वधर्मीय समाज बांधवांनी मनोभावे जल्लोषात स्वागत केले. एसटी चालक प्रशांत गवारगूर व वाहक नितीन नाईक यांचा सरपंच संदीप अल्हाट, पोलिस पाटील गजानन पाचपोर, ग्रामपंचायत सदस्य तथा युवानेते शे. अबरारभाई, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बी. एम. राठोड, शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख दिलीप नवत्रे, वायरमन हिवरे, सुधाकर गायकवाड़ आदिंनी टॉवेल-टोपी देऊन सत्कार केला. भाविकांना फलाहाराचे वाटपदेखील करण्यात आले.
यावेळी जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, जेष्ठ पत्रकार बाळू वानखेड़े, पत्रकार गणेश पाटील, युवासेना नेते गौरव देशमुख, रामचंद्र चव्हाण, शे.रफीकभाई, गणेश गायकवाड़, पुरूषोत्तम नवत्रे, जेष्ठ कार्यकर्ते भिकाजी गायकवाड़, सोहेलखान, सखाराम पाचपोर, फत्तुशेठ, जीवन देशमुख, आत्माराम काळे, महादेव अल्हाट, ऋषीकेश ठाकरे यांच्यासह सर्वधर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर जाणार्या सखाराम पाचपोर दाम्पत्याचाही सत्कार करण्यात आला.