बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बिबी येथे कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय मुंढे हे होते. त्यामध्ये महिला कृषी सन्मानदिनानिमित्त शेतकरी महिलांना आठ किलोचे सोयाबीन बियाणे मिनी किट वाटप करण्यात आले.
कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल त्यामध्ये महाडीबीटीमधील एम. आय. डी. एच योजना, आर. के. व्ही. वाय. कांदा चाळ, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन वापराबाबत, राज्य पुरस्कृत सोयाबीन प्रकल्प बाबत, माती परीक्षण माती नमुना विद्राव्य खताचा वापर, सोयाबीन तूर पिकाविषयी तसेच कपाशी पिकाविषयी संपूर्णतः मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक विलास जाधव व कृषी सहाय्यक कविता साखरे यांनी बचत गटातील महिला शेतकरी व परिसरातील शेतकरी यांना केले, आणि कृषी महिला सन्मानदिनानिमित्त शेतकरी महिलांना आठ किलोचे सोयाबीन बियाणे मिनीट वाटप करण्यात आले.
यावेळी गावातील मान्यवर कृषीमित्र व परिसरातील शेतकरी सुनील गायकवाड, शेख फईम, दीपक गुलमोहर, सखाराम कुलकर्णी, बद्रीनाथ गावडे, विठ्ठल वायाळ, प्रवीण धाईत, राहुल वानखेडे, राम गाडेकर, प्रदीप बनकर, संतोष खंदारे, विजय करपे, भानुदास लहाने व गावातील महिला बचत गट, कृषी मित्र व तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.