बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मुस्लीम बांधवांचा सण असलेल्या बकरी ईदनिमित्तची सार्वजनिक सुट्टी आता बुधवार, २८ जूनऐवजी गुरूवारी, २९ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना आज, २६ जूनरोजी राज्य शासनाने जारी केली आहे.
राज्य शासनाने २०२३ करिता जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील बकरी ईद निमित्तची सार्वजनिक सुट्टी बुधवार २८ जून रोजी दर्शविण्यात आली होती. परंतु सदर सण गुरूवार २९ जूनरोजी येत असल्याने २८ जून रोजीची सार्वजनिक सुट्टी रद्द करून गुरूवार २९ जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. सदर बदल करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्टी बाबतची अधिसूचना आज, २६ जून रोजी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो.ना.बागुल यांनी जारी केली आहे.
दरम्यान, २९ तारखेलाच आषाढी एकादशी आणि बकरी ईद दोन्ही सण आले आहेत. त्यामुळं दोन्ही सार्वजनिक सुट्ट्या एकाच दिवशी आल्यानं त्या ओव्हरलॅप झाल्या आहेत. पण शासनानं यापूर्वी २८ जून रोजी बकरी ईद आणि आषाढी एकादशी २९ तारखेला अशा सलग दोन सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या. पण आता शासनानं यात बदल केल्यानं या दोन्ही सुट्ट्याच एकाच दिवशी आल्यानं एकच सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे.