BULDHANAChikhaliCrime

चिखलीतील ‘त्या’ शिक्षकाला लुटणारे दोघे जेरबंद!

– चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अखेर झाली अटक

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – चिखली शहरातील एका शिक्षकाला ट्रॅपमध्ये अडकवून त्यांचे एका युवकासोबतच्या अश्लील चाळ्यांची चित्रफीत काढत चार लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. १८ जूनला हा प्रकार घडला होता.

या प्रकरणी शिक्षकाने रात्रीच तक्रार दिली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली शहरात राहणारे शिक्षक विवेक सखाराम ढोकणे (वय २४) यांनी अनुषंगिक तक्रारीत म्हंटले आहे की, एका अ‍ॅपवरून त्याची बुलडाणा येथील ऋषिकेश नामक युवकासोबत मैत्री झाली होती. बुलढाणा शहरातील एका कॉलेज जवळ असलेल्या ऋषिकेशच्या घरी शिक्षक आला असता, त्याचे व ऋषिकेशचे नको त्या अवस्थेतील चित्रफीत काढण्यात आली व त्यानंतर विवेक सखाराम ढोकणे यास मारहाण करत, एका शेतात नेत त्याला पैशाची मागणी करण्यात आली. सदर काढलेली चित्रफित व्हायरल न करण्यासाठी त्यास चार लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. पैसे नसल्याचे विवेक ढोकणेने सांगताच त्यांना मारहाण करण्यात आली. याचदरम्यान यावेळी आरोपीसोबत असलेल्या एका युवतीने मध्यस्थी करीत पैसे नसतील तर थोडेफार पैसे देण्याचे सांगितले.

ही घटनाक्रम सुरू असताना शिक्षक ढोकणेना शहरातील एका एटीएममध्ये नेऊन १० हजार रुपये काढून घेण्यात आले. अशा तक्रारी वरून पोलिसांनी ऋषिकेश (वय २०), संतोष जाधव (४०), रूपेश (३०) आणि एका युवतीविरोधात बुलढाणा शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आणखी फरार दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!