– मेरा बुद्रूकसह ४० गावांतील दूध उत्पादक शेतकर्यांना होणार फायदा!
मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक फाटा येथे अमर दूध डेअरीचे दूध संकलन व शीतकरण केंद्राचे दिनांक २१ जूनरोजी शेतकर्याच्याहस्ते फीत कापून उद्घाटन पार पडले. या प्रसंगी अमर दूध डेअरीचे मॅनेजर विजय हडपे, सर्कल मॅनेजर तुषार शेकोकार, दूध संकलन टीमचे उदय पाटील यांच्यासह परिसरातील दूध उत्पादक शेतकरी हजर होते. याप्रसंगी मेरा बुद्रूक परिसरात दूधगंगा वाहणार असून, पाच हजार लीटर दूध संकलानाचे लक्ष्य निर्धारित असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
मनुबाईसारख्या खेड्यातून दोन शिक्षित तरुण किशोर आत्माराम वायाळ व ईश्वर तुकाराम वायाळ यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतरून आपली वेगळी ओळख निर्माण केली. या दोन तरुणांनी मेरा बुद्रूकसारख्या ग्रामीण भागात अमर दूध डेअरीचे दूध संकलन व शीतकरन टाकून त्याचा थेट दूध उत्पादक शेतकर्यांना फायदा होणार आहे. मेरा बुद्रूक येथील दूध संकलन केंद्रामध्ये गाई व म्हशीचे मिळून दहा हजार लीटरपर्यंत दूध संकलन होणार आहे. या दूध संकलनामध्ये परिसरातील दूध उत्पादन शेतकर्यांचे दूध वाढल्यास भविष्यात पन्नास हजार लीटरपर्यंत दूध संकलन करण्याचा अमर डेअरीचा माणस आहे. आजपर्यंत अमर डेअरीचे ४०० हून अधिक दूध संकलन केंद्र असून, सहा ते सात हजार शेतकरी अमर डेअरीशी जुटलेले आहेत. दूध उत्पादक शेतकर्यांना दहा दिवसाला दुधाचे बिल खात्यात जमा केले जावे, अशी व्यवस्था केली आहे. अमर डेअरीच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या धाडसाने अमर डेअरीचे प्रकल्प उभे राहत आहेत, त्याचा थेट ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकर्यांना लाभच होणार आहे. अमर दूध संकलन केंद्रामार्फत दुधाचे दर स्थिर ठेवून त्या व्यतिरिक्त शेतकर्यांना कसा फायदा मिळेल हे बघितले जाणार आहे. दूध संकलन केंद्रामुळे दूध व्यवसायिक शेतकरी आहे त्यांना चांगला लाभ मिळणार आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये दूध उत्पादनासाठी स्पर्धा लागणार असल्याने चिखली तालुक्यातील ग्रामीण भागात नक्कीच दूधगंगा येईल, असे याप्रसंगी सांगण्यात आले.
दूध संकलन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी अमर डेअरीचे मॅनेजर विजय हडपे, सर्कल मॅनेजर तुषार शेकोकार, दूध संकलन टीमचे उदय पाटील सह किशोर वायाळ, ईश्वर वायाळ, संतोष मापारी, मोहन पडघान, पत्रकार कैलास आंधळे, दीपक लहाने, संजय खेडेकर, प्रमोद वायाळ, गजानन जायभाये, कैलास कायंदे, सतिश पडघान, नंदकिशोर गवई, शरद खरात, काशिनाथ घुगे यांच्यासह परिसरातील दूध उत्पादक शेतकरी हजर होते.
आमची कुठल्याही इतर दूध डेअरींची स्पर्धा नसून, पारदर्शकपणे दूध घ्यायचे. लहानपासून ते ज्येष्ठ, रुग्णांसह अन्य कारणांसाठी दूध लागते, याची जाणीव ठेवून दूध व्यवसाय करणारा शेतकरी आहे. दूध धंद्यासाठी काही मंडळी दूध कलेक्शन वाढवण्यासाठी एक रुपया दोन रुपया वाढवतात आणि दूध वाढले की दूध दर कमी करतात, तसे आम्ही नफा कमावण्यासाठी नाहीतर शेतकर्याला योग्य मोबदला देऊन सेवा करण्याचे काम अमर डेरीमार्फत करीत आहोत.
– विजय हडपे, मॅनेजर अमर डेअरी
———-