ChikhaliVidharbha

अंत्री कोळी-वाघापूर गट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. वर्षाताई विठ्ठल गिरी

चिखली (महेंद्र हिवाळे) – राजकारण व समाजकारणात सक्रीय असलेले विठ्ठल गिरी यांच्या पत्नी व अंत्री कोळी – वाघापूर गट ग्रामपंचायतीच्या सदस्या तथा माजी सरपंच सौ. वर्षाताई विठ्ठल गिरी यांची या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बहुमताने निवड झाली आहे. त्यांच्या या राजकीय एण्ट्रीने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीत सौ. वर्षाताई विठ्ठल गिरी यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक अर्चना हिवाळे, सरपंच, सदस्य हजर होते. अंत्री कोळी- वाघापूर गावामध्ये अगोदर तीन वर्षे सरपंचपदावर त्या कार्यरत होत्या. तसेच अडिच वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आता उपसरपंचपदी त्यांची निवड झाली आहे. त्यांचे पती विठ्ठल गिरी हे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते असून, त्यांचा विविध समाज कार्यात मोठा सहभाग असतो. अंत्रीकोळी, वाघापूर गाव असो, की केळवद जिल्हापरिषद सर्कल असो, सर्व तालुक्यात त्यांचे सामाजिक काम मोठे आहे. सौ. वर्षाताई विठ्ठल गिरी या उपसरपंच झाल्याबद्दल सोशल मीडिया तसेच गावागावामधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जिल्हा परिषदेसाठी सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!