बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंढेरा पोलिस ठाणेहद्दीत प्रतिबंधीत गुटखा पकडून आरोपी अमीर खान सुगु खान (वय २४) रा. सुन्हेडा सुमहरा, हरियाणा राज्य यास अटक केली होती. यावेळी आरोपीच्या ताब्यातून ४ लाख ८० हजार रुपये किंमतीचा गुटखा, एक कंटेनर वाहन २० लाख रूपये, एक मोबाईल किंमत १० हजार रुपये असा एकूण २४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. ही कारवाई २८ मेरोजी करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपींविरूध्द भादंवि कलम ३९५, ५०६, ३२८,१८८,२७३ सह कलम २६ ( २ ) (४), ५९ अन्न व सुरक्षा माणके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आणखी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणात आतापर्यंत ४८ लाख ३५ हजार ६०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात अद्यापपर्यंत अमिरखान सुग्गुखान २४ वर्षे रा. सुन्हेडा, परशुराम मोहन गायकवाड २२ वर्षे रा. बीड, गोविंद नवराथ खांडे २६ वर्षे रा. पिंपळगांव मजरा ता.जि. बीड, विवेकानंद ऊर्फ स्वामी जगन्नाथ गुजर २६ वर्षे रा. बीड आदींना अटक करण्यात आली. गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या आरोपींना विचारपूस दरम्यान गुन्ह्यातील मुद्देमाल बीड या ठिकाणी असल्याचे समजले. त्यावरुन तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सचिन कानडे यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक तयार करुन बीड जिल्ह्यात रवाना करण्यात आले होते. सदर तपास पथकाने १२ जून रोजी आरोपी गोविंद नवराथ खांडे वय २६ रा. पिंपळगांव मजरा ता. जि. बीड याचेकडून, बीड शहरामध्ये सदर गुन्ह्यात वापरलेला एक ट्रक किंमत १५ लाख रुपये, एक कार किं. ४ लाख ५० हजार रुपये, शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत पान मसाला / गुटखा कि. ३ लाख ७५ हजार ६०० रुपये, दोन मोबाईल २० हजार रुपये असा एकूण २३ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
अद्याप पावेतो सदर गुन्ह्यामध्ये गुटखा, वाहने, मोबाईल असा एकूण ४८ लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे. सदर कारवाई सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक बुलढाणा, अशोक थोरात अपोअ. खामगांव, बी. बी. महामुनी – अपोअ. बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्था. गु.शा. यांचे नेतृत्वात तपास अधिकारी पोउपनि सचिन कानडे, पोना. पुरुषोत्तम आघाव, पोना. अनंता फरताळे, पोकॉ. अमोल शेजोळ, पोकॉ. मनोज खरडे, पोकॉ.दिपक यांनी केली.