स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भगदाड; अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्षांसह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष शेख रफिक शेख करीम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी १४ जूनरोजी शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा मातोश्री संपर्क कार्यालय येथे दुपारी पार पडला. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठे भगदाड पडले आहे.
आमदार संजय गायकवाड यांच्या निर्णय क्षमता व विकासाचा झंजावात यामुळे बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलत चाललेला आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफिक यांनी आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. शेख रफिक शेख करीम हे मागील सोळा वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कार्यरत आहे. मात्र सद्यस्थितीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक तसेच सर्वधर्मीय लोकांमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी विश्वास निर्माण केला आहे, त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन अल्पसंख्यांक समाजाच्या भविष्यातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी आ. संजय गायकवाड यांनी येणार्या काळामध्ये सर्व समुदायातील छोटे मोठे समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ, असे आश्वासन यावेळी दिले. सदर कार्यकर्त्यांच्या प्रवेश प्रक्रियेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेस खिंडार पडलेचे चित्र आहे. यावेळी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, शिवसेना नेते संदीप गायकवाड, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड, माजी नगरसेवक शेख याकूब, शे.अफसर, मनोज यादव, शहबाज चौधरी, शेख अहफाज, शेख सादिक शेख सादिक, शेख शहजाद, बाबा शेख, जावेद शेख, रशु शेख, साजिद शेख, नजीर शहा, अनिस शहा, इरफान शहा, हसन शहा, सय्यद सईद, वसीम चौधरी, शेख अरबाज यांच्यासह असंख्य शिवसेना, युवासेना पदाधिकारी तथा अल्पसंख्यांक आघाडीचे सदस्य उपस्थित होते.