Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPachhim MaharashtraPuneWorld update

लोणावळाजवळ ऑईल टँकर पेटला; तिघे होरपळून ठार,  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ठप्प!

साडेपाच तासानंतर टँकर बाजूला घेण्यात यश, टँकरमध्ये होते मिथेनॉल!

सायंकाळचे पाच वाजले तरी परिस्थिती नियंत्रणात न आल्याने अनेक प्रवासी अडकले. हजला जाणार्‍यांची मुंबई विमान तळावर पोहोचण्यासाठी धावपळ सुरू झाली. देशातील सर्वोत्तम महामार्गावरील यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. जवळपास साडेपाच तासानंतर टँकर बाजूला घेण्यात यश आले. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. एक्सप्रेस वे च्या वाहतूक कोंडीत अडकलेल्यांची स्थानिकांनी तहान-भूक भागवली. यानिमित्ताने माणुसकीचे दर्शन घडले. दरम्यान, या टँकरमध्ये डिझेल नाही तर मिथेनॉल हा ज्वालाग्रही पदार्थ होता, असे महामार्ग अधिकार्‍यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रला सांगितले आहे.


लोणावळा (मुस्कान अन्सारी) – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील लोणावळाजवळील ओव्हर ब्रीजवर ऑईल टँकरचा भीषण अपघात होऊन, हा टँकर पलटी झाला. त्यामुळे त्यातील ऑईल रस्त्यावर सांडून त्याने पेट घेतला. हा अपघात नेमका उड्डाणपुलावर घडल्याने सांडलेले ऑईल व त्याचा भडका पुलाच्या खालीही आगींच्या लोळासह पडला. त्यामुळे या विचित्र व भीषण अपघातात अनेक वाहने पेटली असून, आतापर्यंत तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यात एका ११ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. तीन ते चार जखमींवर खंडाळा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुपारपर्यंत दोन्ही लेनवरील वाहतूक ठप्प होती. लोणावळा शहरातून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती. लोणावळा ते खंडाळादरम्यान असलेल्या कुनेगाव पुलावर हा दुर्देवी अपघात घडलेला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळयाजवळ खंडाळाहद्दीत ओव्हर ब्रीजवर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ऑईलचा टँकर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात टँकरने पेट घेतल्याने त्याला भीषण आग लागली. त्यामुळे ब्रीजखालून जाणार्‍या गाड्यांवरही लागीच्या लोळांसह ऑईल सांडून त्या गाड्यांनी पेट घतला. धक्कादायक बाब म्हणजे, रस्त्यावर ऑईल सांडल्याने एक दुचाकीस्वार यावरून घसरला. यामध्ये दुचाकीवरील ११ वर्षांचा मुलगा होरपळून ठार झाला. तर, त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले. जखमींवर खंड्याळ्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुपारनंतर लोणावळा शहरातून वाहतूक वळविण्यात आली होती. अपघातात जखमी झालेल्यांना खंडाळा येथील पवना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची माहिती दिली आहे. मुंबईकडे येणारी व पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरूळीत करण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!