मेहकर (तालुका प्रतिनिधी) – ‘मोदी – ९ संपर्क से समर्थन’ अभियानाअंतर्गत बुलढाणा जिल्हा दौर्यावर आलेले केंद्रीय पर्यावरण, वने आणि कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्रसिंह यादव यांनी आज विवेकानंद अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. शिव ठाकरे यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. तसेच, कमी कालावधीत ही पतसंस्था नावारूपाला आणल्याबद्दल मंत्री भूपेंद्रसिंह यांनी अॅड. ठाकरे यांचे याप्रसंगी कौतुकदेखील केले.
याप्रसंगी मंत्री भूपेंद्रिंसह यांनी महाराष्ट्र सहकार कायदा, तसेच स्थानिक राजकारण व सहकार याबाबत अॅड. ठाकरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. तसेच, आपणदेखील अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे महासचिव म्हणून काम केले असून, या पदावरील कामाचा अनुभवदेखील त्यांनी ठाकरे यांना सांगितले. यावेळी जळगाव जामोदचे आमदार डॉ.संजय कुटे, माजी आमदार चैनसुख संचेती, खामगावे आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार विजयराज शिंदे, भाजपाचे नेते प्रल्हाद लष्कर, प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, जिल्हा महामंत्री मोहन शर्मा यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी पतसंस्थेचे संचालक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
——————-