BULDHANAChikhaliVidharbha

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ‘प्रजानिष्ठ’ राज्यकर्त्या – राहुल बोंद्रे

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – इंदूर, महेश्वर, उज्जैन येथे राहूनही अहिल्यादेवी होळकर यांची दृष्टी भारतभर होती. जिथे त्यांचा प्रत्यक्ष कारभारी नव्हता, अशा ठिकाणीचही प्रजा पुण्यश्लोक अहिल्याचरणी नतमस्तक होते. याचे कारण म्हणजे अहिल्यादेवी ‘प्रजानिष्ठ’ राज्यकर्त्या होत्या, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त युवा नेते सनी पांढरे यांच्या पुढाकारातून ३१ मे रोजी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोंद्रे बोलत होते. हिमालयाच्या केदारनाथपासून, दक्षिणेच्या रामेश्वरापर्यंत आणि जगन्नाथ पुरी ते द्वारकेपर्यंत मंदिरे, घाट, धर्मशाळा अन्नछत्रे, पाणपोया पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी उभारल्याचे सनी पांढरे यांनी सांगितले.

प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी युवतींनी अहिल्याबाईंच्या वेशभूषेत सहभाग घेतला. येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत युवकांनी भंडार्‍याची उधळण केली. तर वाघ्या मुरळी पथकाने उपस्थित्यांचे लक्ष वेधले होते. फटाक्याच्या आतषबाजीने छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ शोभायात्रेची सांगता झाली.

याप्रसंगी राम थोरात, रामदास पाटील,भागवत पाटील,कैलास पांढरे ,प्रवीण हटकर ,प्रदीप पाटील, उदय पाटील,जय पाटील,अमर पाटील,गणेश पांढरे,ऋषिकेश पाटील,भगवान बोराडे,मंगेश पाटील, योगेश पाटील,अनिकेत पाटील, श्लोक पाटील,अजय पाटील, अर्जुन थोरात,विनायक पाटील,गोपाल पाटील,राहुल पाटील, हर्षल पांढरे,गणेश पाटील,सौरभ सोनाळकर,उमेश पाटील,दुर्योधन पाटील,कुणाल राऊत,कुणाल लोखंडे सूरज पांढरे,सनी पाटील,बंटी पाटील,प्रमोद पाटील, अक्षय पाकारे यांच्यासह केळवद ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!