ChikhaliVidharbha

आशा गाडे, माया तांबट यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार

चिखली ग्रामीण (प्रतिनिधी) – गावामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असलेल्या अंगणवाडी सेविका श्रीमती आशाबाई गाडे व माया तांबट यांना मंगरूळ नवघरे ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मान्यवरांच्याहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या समजकार्याने प्रेरित व महिलांना त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरावे करिता महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने समाजात प्रेरणादायी कार्य करणार्‍या महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. मंगरूळ नवघरे येथील अंगणवाडी सेविका श्रीमती आशाबाई गाडे व माया तांबट यांनी हुंडाबळी, महिला सक्षमीकरण, आरोग्य, साक्षरता विविध क्षेत्रात जनजागृती करून समाज प्रबोधनाचे कार्य करणार्‍या श्रीमती आशा गाडे व माया तांबट यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यालय मंगरूळ नवघरे यांनी महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायत मंगरूळ नवघरे यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुरस्कार व रोख पाचशे रुपये प्रोत्साहन पार बक्षीस देण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सचिव तथा सर्व सदस्य हजर होते.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!