– राज्य शिक्षण मंडळाची माहिती – उद्या सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद
पुणे (सोनिया नागरे) – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल कधी लागतो, याची दहावीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व त्यांचे पालक चातकासारखी प्रतीक्षा करत होते. ही प्रतीक्षा आता संपली असून, उद्या म्हणजेच ०२ जूनरोजी दुपारी एक वाजेनंतर इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
विद्यार्थ्यांना 1. www.mahresult.nic.in 2. http://sscresult.mkcl.org 3. https://ssc.mahresults.org.in या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. मार्च २०२३ मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण या संकेतस्थळांवरुन पाहता येतील, तसेच गुणांची प्रिंट आउट घेता येईल. राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली होती. या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आता या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.
तसेच, या निकालाबाबत शिक्षण मंडळ शुक्रवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत माहिती देणार असून, राज्यातील निकालाची टक्केवारी जाहीर केली जाईल. तसेच किती विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले? राज्याचा एकूण निकाल किती लागला? परिमंडळनिहाय निकाल किती लागला? याची माहिती शिक्षण विभागाकडून दिली जाईल. त्यानंतर दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचं लक्ष लागले आहे.
—-
– पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
———–
असा पाहा निकाल
स्टेप १) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
स्टेप २) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
स्टेप ४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
————–