खामगाव/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक भागवत ठाकरे (वय ४७) यांचे आज, १ जूनरोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने आज बाजार समिती व्यवहारदेखील बंद ठेवण्यात आले आहेत. या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त होत होती.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघातून भागवत ठाकरे हे नुकतेच निवड़ून आले होते. त्यांना ३० मे रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. अकोला येथे उपचार सुरू असतांना आज १ जून रोजी सकाळी ४ वाजेदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. खामगावचे आमदार अॅड़. आकाश फुंड़कर यांचे कट्टर समर्थक असलेले भागवत ठाकरे हे मलकापूरचे आमदार राजेश एकड़े यांचे व्याही होते. त्यांच्या निधनाने आज खामगाव बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
————-