शासनाने सिंदखेडराजा व करवंड या दोन्ही स्थळांचे संवर्धन करावे; ऐतिहासिक वास्तू संवर्धनासाठी ५०० कोटीचा निधी द्यावा!
बुलढाणा (संजय निकाळजे) – ऐतिहासिक ओळख असलेले करवंड गावी असणारे प्राचीन वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांची समाधीसुद्धा दुरवस्थेत आली आहे. या दोन्ही स्थळंचे संवर्धन शासनाने करावे, तात्काळ कृती आराखडा तयार करावा, व पाचशे कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी बावणबुरजी बचाव कृती समितीने केली आहे. तसेच याकडे दुर्लक्ष झाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना आज समिती पदाधिकार्यांनी निवेदन देऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली.
बुलढाणा जिल्ह्याची ऐतिहासिक ओळख बावनबुरजी (करवंड) तसेच जिजाऊ साहेबांचे जन्मस्थळ मातृतीर्थ सिंदखेडराजा यामुळे आहे. करवंड येथे अनेक बांधकाम आहे. बर्याच अंशी ते सुरक्षित आहे. त्याच संवर्धन केले तर हा ऐतिहासिक ठेवा जतन केल्या जाईल. अन्यथा तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी शासनाने ५०० कोटी रुपयांची तरतूद करून आराखडा तरा तयार करावा, अशी मागणी मराठा समाजातील सामाजिक नेते सुनील जवंजाळ पाटील यांनी केली आहे. तर ज्या इंगळे घरातील दोन राण्या छत्रपती भोसले घराण्यात दिल्या गेल्या त्या गुणवंताबाई व दीपाबाई साहेब यांच्या घरातील इंगळे सरदार तंजावर निवासी हरीरुद्र राजे यांनी आज जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी कृती समिती सदस्य अरविंद बापू देशमुख, सुनील सपकाळ, पत्रकार गणेश निकम, सुरेखाताई सावळे, डॉक्टर अशोकराव खरात, अण्णासाहेब मळसणे, प्रभाकर काळवाघे, पीएम जाधव, रामदास शिंगणे, पत्रकार गणेश उबरहांडे, लक्ष्मीनारायण सुर्वे, दिनकरराव चिंचोले, भगवान कानडजे, माधवराव जपे आदी उपस्थित होते.