BULDHANAChikhali

रेतीअभावी घरकुलांची बांधकामे रखडली!

मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात विविध योजनेअंतर्गत गरीब लोकांचे घरकुलाचे काम सुरू आहे. त्यांनी त्यांचे राहते घर मोडून त्या जागेवर नवीन घरकुल बांधकाम चालू केले, पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपला आहे, तरी रेतीअभावी घरकुलाची कामे अर्धवट अवस्थेत रखडलेली आहेत. अर्धवट अवस्थेत घरकुलांची कामे रखडल्यामुळे त्यांची अनुदानहीसुद्धा रखडले आहे. पंचायत समितीमधून घरकुलाचा जस जसा एक एक टप्पा पूर्ण होईल, त्यानुसार अनुदान निधी देण्यात येते. परंतु रेतीअभावी अपूर्ण राहिलेल्या घरकुलाचे अनुदान त्या घरकुल लाभार्थ्यांना मिळाले नसल्यामुळे ते लाभार्थी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. त्यातच पावसाळा सुरू झाल्यानंतर या गरीब लोकांचा राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. ग्रामीण भागातील शेतीचे कामे जवळ आल्यामुळे शेती आणि अपूर्ण राहिलेले घर असा दुहेरी सामना ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना करावा लागत आहे. तरी शासकीय स्तरावरून तातडीने पासेस किंवा रेती उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून राहिलेले घरकुल पूर्ण होऊन त्यांचे राहिलेले अनुदान त्यांना मिळेल, व पावसाळा सुरू होण्याअगोदर त्यांना आपले हक्काचे घर राहण्यासाठी मिळेल, असे निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा यांना ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती विदर्भातील पदाधिकारी व बुलढाणा जिल्ह्याच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने देण्यात आले आहे.

या निवेदनावर ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती विदर्भ उपाध्यक्ष सचिन खंडारे, नागपूर विभाग विदर्भ मुख्य संघटक सुनिल अंभोरे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर गंगाराम उबाळे, बुलढाणा जिल्हा सचिव कैलास आंधळे, जिल्हा उपाध्यक्ष बबन सरकटे, चिखली तालुका अध्यक्ष ज्ञानदेव वायाळ इत्यादी पदाधिकार्‍यांच्या सह्या आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!