Pachhim MaharashtraSOLAPUR

जलसंधारण अधिकारी पंडित भोसले यांच्या कार्यकाळात बांधले गेले १५८ पाझर तलाव!

सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी पंडित भोसले यांनी आपल्या ३८ वर्षाच्या शासकीय सेवेत जवळपास १५८ पाझर तलाव बांधले. या पाझर तलावामुळे दुष्काळीपट्टातील बळीराजाची शेती फुलू लागली आहे. त्यामुळे शासकीय सेवेत केवळ नोकरी न करता बळीराच्या शेतामध्ये पाणीसाठा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम केले.

पंडित भोसले यांचे वडिल मैलकुली म्हणून सोलापूर जिल्हा परिषद मध्ये होते. अतिशय संघर्षातून शिक्षण पूर्ण करून पंडित भोसले यांनी जलसंधारण अधिकारी या पदापर्यंत गवसणी घातली आहे. त्यांचा जन्म पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी येथे १९६५ रोजी झाला. त्यानंतर त्यांचे प्राथमिक शिक्षण १९७६ ते १९८१ पंढरपूरच्या झेडपी शाळेमध्ये झाले. १९८१ ते १९८४ यावर्षी त्यांनी शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी १९८५ मध्ये लघु पाटबंधारे कार्यालयात रूजू झाले. १९८६ मध्ये सहा महिने लघु पाटबंधारे सांगोला येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत. १९८८ लघु पाटबंधारे उत्तर सोलापूर येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत. त्यानंतर पुढे १९८८ ते २०२१ पर्यंत ३४ वर्ष मोहोळ मंगळवेढा येथे शाखा अभियंता म्हणून काम पाहिले.
त्यानंतर त्यांची पदोन्नती होऊन त्यांच्याकडे जिल्हा जलसंधारण अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पंडित भोसले यांच्या जवळपास ३८ वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी एक लाख ८९ हजार ६०० दिवस इतके मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच अठरा गाव तलाव, २९ कोल्हापूर पद्धतीचे बंधारा, १२२ सिमेंट बंधारे, १२५० जवाहर विहीर अंतर्गत महात्मा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विहिरी पूर्ण करून शेतकरी वर्गाला पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये बळीराजाच्या शेतामध्ये पाण्याचा साठा उपलब्ध झाला.

याबरोबरच भोसले यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे म्हणजे माढा तालुक्यात बेंढ ओढा नाल्याचे खोलीकरण करून पुनर्जीवन केले. या खोलीकरणामुळे शेतकर्‍यांची विहिरीचे पाणी वाढले. तसेच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत २०१५ ते २०१९ या वर्षांमध्ये १८५ पाझर तलाव दुरुस्ती करण्यात आले. १२ गाव पातळीवरील तलाव दुरुस्ती करण्यात आले. या दुरुस्तीमुळे भूजल पातळी वाढली व प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र पून स्थापित केले. विशेष म्हणजे जलसंधारण अधिकारी पंडित भोसले यांनी केवळ नोकरीच न करता गावाला निर्मल ग्राम पुरस्कार, तंटामुक्ती गाव पुरस्कार, संत गाडगेबाबा पुरस्कार मिळवून दिले. तसेच जिल्हा परिषद क्रमाक एक येथे गेल्या ३० वर्षापासून मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!