Breaking newsHead linesMaharashtraPune

उद्या दहावीचा निकाल शक्य!

पुणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच एक जून रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एक जूनला दुपारी विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पाहता येईल. याबाबत शिक्षण मंडळाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, लवकरच तशी घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होऊन काही दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. साधारणतः बारावीचा निकाल लागल्यानंतर काहीच दिवसात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक आता शिगेला पोहोचलेली आहे. यंदा दहावीच्या लेखी परीक्षा या दोन ते पंचवीस मार्च या कालावधीत संपन्न झाल्या. परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ मुलांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये ८ लाख ४४ हजार ११६ मुले तर ७ लाख ३३ हजार ६७ मुलींचा समावेश होता. मात्र गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणार्‍या विद्यार्थी संख्या कमी झाल्याचे निदर्शनास आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६१ हजार ७०८ विद्यार्थांनी कमी झाली आहे.


असा पहावा लागणार निकाल..

निकाल बघण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचे हॉल तिकीट आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचा रोल नंबर नीट बघून एंटर करणे आवश्यक आहे. आईचे नाव हे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करावे लागणार आहे. त्यानंतर येणारे बेसिक बेरीज किंवा वजाबाकीचे गणित सोडवून तुम्हाला निकाल बघता येणार आहे.

निकालासाठी वेबसाईटस

1) mahresult.nic.in

—————
दहावी निकाल मोबाईल मध्ये कसा चेक करायचा याबद्दल ची पद्धत खाली देण्यात आले आहे.
1) mahresult.nic.in या वेबसाईट वरती क्लिक करा.
2) येथे SSC Examination March – 2023 Result व्यापाऱ्यावर क्लिक करा.
3) आता तुमचा Seat No. व आईचे नाव टाका.
4) View Result बटनावर क्लिक करा.
5) तुम्ही टाकलेली माहिती अचूक असल्यास निकाल दाखवला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!