मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील लक्ष्य करिअर अकॅडमी महाराष्ट्रातील शिस्त व कठोर मेहनत तसेच मुलांकडून परिपूर्ण अभ्यास घेण्यासाठी ओळखली जाणारी एकमेव संस्था म्हणून ओळखली जाते. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरती मुंबई येथे पोलीस भरतीत येथील १७ मुले व मुली पोलीस सेवेसाठी भरती झाली आहेत. लक्ष्य अकॅडमी तर्फे आज, दिनांक २८ मेरोजी लक्ष करियर अकॅडमीच्या प्रांगणात सर्वांचा भव्य सत्कार सिंदखेडराजाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी मंचावर साखरखेर्डा नगरीचे सरपंच, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, दाऊद कुरेशी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे, यांच्यासह मंचावर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये बबन तिकडे, राजन गावंडे, विलास केवट, पुरुषोत्तम कापसे, गोपाल सरोदे, धीरज इंगळे, भागवत उमाळे, श्याम सरोदे, करिष्मा इंगळे, पल्लवी नरवाडे, अश्विनी बागडे, पल्लवी निकम, राजू कोठारे, श्याम तोंडे, प्रदीप पाटोळे, अजय अवसरमोल, अमोल जाधव, माजी सैनिक झिने यांचा दिनांक २० मे २०२३ च्या पोलीस भरती मध्ये लक्ष अकॅडमीचे १७ विद्यार्थ्यांचीनिवड झाल्याबद्दल सिंदखेड राजाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्यासह पत्रकार सचिन खंडारे, ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूजचे कैलास आंधळे, भारत संग्रामचे तालुका प्रतिनिधी सुनील अंभोरे, समाधान सरकटे, गंगाराम उबाळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सचिन खंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्जुन गवई यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आई-वडिलांसह नातेवाईक व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.