BULDHANAMEHAKARVidharbha

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान!

मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – रात्रीच्या अंधारात विहिरीत बिबट्या पड़ल्याची घटना आज, २७ मे रोजी सकाळी मेहकर तालुक्यातील इसवी वर्तुळात उघड़कीस आली. त्यानंतर वन कर्मचारी व गावकरी यांनी धावाधाव करत सदर बिबट्याला शिडीच्या सहाय्याने बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आला. गावकरी व वनविभागाच्या सतर्कतेमुळे या बिबट्याला जीवदान मिळू शकले.

मेहकर तालुक्यातील इसवी वर्तुळातील इसवी बीटमधील इसवी येथील कास्तकार किसन गोळाजी खंड़ारे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पड़ला असल्याची घटना आज, दि. २७ मे रोजी सकाळी उघड़कीस आली. सदर माहिती वनपाल सोनोने यांना कळताच त्यांनी गावकरी व वनकर्मचारी यांच्या सहकार्याने शिड़ीच्या सहाय्याने सदर बिबट्याला बाहेर काढले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले. यावेळी किसन खंड़ारे, बंडू धंदरे, भगवान अंभोरे, नीतेश जाधव, शंकर चव्हाणसह वनरक्षक भोंड़णे, कु. रूपाली ठोंबरे, सिंगल, वनमजूर काशिदसह गावकरी उपस्थित होते, अशी माहिती वनपाल सोनोने यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!