Pachhim MaharashtraSOLAPUR

लक्ष्मी विष्णू मिल कामगारासाठी घरकुल योजना राबवा!

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – शहरातील लक्ष्मी विष्णू मिल कामगारासाठी मिलच्या जागेमध्ये घरकुल योजना राबवावी. तसेच मिलची जागा हस्तांतरीत करणेसंदर्भात योग्य ते निर्देश देवून लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी भाजपच्या कामगार आघाडीने कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडे नितीन करजोळे यांनी केली आहे.

सोलापूर शहर हे एकेकाळी गिरणगांव या नांवाने ओळखले जात होते. परंतु सध्या शहरीकरण अनेक गिरण्या / मिल बंद पडल्या आहेत. त्यामध्ये एक मिल म्हणजे लक्ष्मी विष्णू मिल आहे. या मिलमुळे पूर्वी अनेक गरीब कामगार काम करीत होते. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबाना वेतन कमी जरी असले तरी जगण्यापुरता रोजगार मिळत होता. कालातराने मिल बंद पडत गेली. आता सध्या बंद पडलेल्या लक्ष्मी विष्णु मिलमध्ये पूर्वी जवळपास ३० हजार कामगार अहोरात्र काम करीत होते. आता सध्या कामगार वयस्कर व जेष्ठ नागरीक आहेत. काही त्यापैकी मयत झाले आहेत. जे कामगार आजमितीस जीवंत आहेत ते सर्व सध्या हालाखीची पपस्थितीचा सामना करीत आहेत. त्यांच्या मुलांना शिक्षित करुन नोकरी अथवा धंदा करणेबाबत पैसा व जागेची अपुरी पडत आहे. सन १९९५ सालापासून लक्ष्मी विष्णू मिलचे कामगार हालाखीचे दिवस काढत असून सध्या कोरोनाचा प्रसार होऊन जगभर महामारी पसरल्याने व त्यामुळे झालेल्या लॉकडाऊन मुळे सदर कामगारांची मुले यांचा थोडे बहुत चाललेला संसार पूर्णपणे उध्दवस्त झाला आहे. तसेच पूर्वीचे कामगार नेते अथवा कामगार कर्मचारी हे वयोमानामुळे आता वयस्कर झाले आहेत, असेही करजोळे यांनी नमूद केलेले आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!