– शासकीय उपक्रमाचा लाभ घ्यावा – तहसीलदार कव्हळे
चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन मौनीबाबा संस्थान चिखली येथे शनिवारी, दि.२७ मेरोजी सकाळी ठीक १० वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार असल्याने कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चिखलीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी केले आहे. शासनाच्या विविध योजना थेट लोकांपर्यंत नेणारे कव्हळे हे जिल्ह्यातील पहिलेच तहसीलदार ठरलेले आहे.
मौनीबाबा संस्थान चिखली येथे शासन आपल्या दारी हा लोकोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आला असून, त्याचे उदघाटन आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमा अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबाराचेदेखील आयोजन करण्यात आले असून, या शिबारात टॅक्सी चालक, रिक्षाचालक, हमाल वर्ग यांचे व त्यांच्या परिवारातील सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, विविध प्रकारच्या तपासण्या निशुल्क करण्यात येणार आहे. तहसील अंतर्गत संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, नैसर्गीक आपत्ती, सेतु विभागाचे विविध प्रमाणपत्रे, सलोखा योजना, शिधा पत्रिका, पंतप्रधान किसान सन्मान योजना आदी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात येणार आहे.
या शिवाय, पंचायत समिती अंतर्गत, स्वच्छ भारत मिशन, शासकीय जागेचे भाडेपट्टे वाटप, शिक्षकांना टॅब वाटप, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी योजना, वैयक्तीक शौचालय अनुदान वाटप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी योजना, कृषी परवाना वाटप, बचत गट, बँक कर्जवाटप आरोग्य विभागा संबंधित प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जननी सुरक्षा योजना, पशु संवर्धन विभागामार्फत विशेष घटक म्हैस गट, शेळी गट, वैरणविकास योजना एकात्मीक बालविकास प्रकल्प विभागामार्फत माझी कन्या भाग्यश्री योजना, विशेष घटक योजनेअंतर्गत शिलाई मशीन वाटप, पीठाची चक्की, घरगुती म्हसाला उदयोग वाटप, मिनी दालमिल पीकोफॉल, पहील्या खेपीच्या मातांना बेबी केअर किट वाटप, तालुका कृषी विभागामार्फत, नवीन विहीर योजना, जुनी विहीर दुरूस्ती, विद्युत एच. पी. पंप संच, विज जोडणी आकार, नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, तालुका आरोग्य अधिकारी विभागामार्फत आरोग्य संबंधी विविध योजना व आरोग्य तपासणी याचा समावेश आहे. वरील योजनांचा लाभ व सविस्तर माहिती प्राप्त करून घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने दिनांक २७ मे रोजी सकाळी ठीक १० वाजता श्री मौनीबाबा संस्थान चिखली येथे उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
————–