Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

महसूल भ़वनच्या २५ टक्के कार्यालयाला जागा पडतेय कमी!

सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूरच्या महसूल भवनाचे जवळपास ७५ टक्के कार्यालय शिफ्ट होण्याच्या मार्गावर आहे. परंतु उर्वरित २५ टक्के कार्यालयासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे या इमारतीच्या वरच २५ टक्के कार्यालय स्थलांतरीत करण्यासाठी लवकरच निधीची उपलब्ध करू. कारण सर्व कार्यालय एकत्र येतील, असा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी सोलापूरला आले असता त्यांच्या हस्ते सात रस्ता येथे बांधण्यात आलेले नवीन महसूल भवनाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले, की शेतकर्‍यांना १२ तास दिवसा वीज पुरवठा मिळावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारता येऊ शकेल का, त्याचे देखील नियोजन आम्ही करीत आहोत. त्यासाठी जमीन उपलब्ध करून देऊ. सौरवाहिनी या योजनेचा आढावा घेतला, त्यासाठी गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना, जलयुक्त शिवार व जलजीवन मिशन योजनेचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला. राज्य सरकारने आतापर्यंत शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस व इतर मदतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना जवळपास ४७२ कोटी रुपये वेगवेगळ्या मदतीच्या माध्यमातून दिले आहे. त्यामुळे उर्वरित मदतही लवकरच शेतकर्‍यांना देण्यात येईल. त्याचे साक्षांकन झालेले आहे. हे पैसे शेतकर्‍यांपर्यत पोहचले की नाही याचा आढावा घेतला. जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेण्यात आला त्यामध्ये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबवली जाईल. विशेषतः जलयुक्त शिवार दोन ही योजना राबविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जवळपास १६७ गावात या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार एकमध्ये फलनिष्पत्तीचा आढावा घेतला तर असे लक्षात आले की, ३ लाख १७ हजार संरक्षित सिंचन क्षेत्र तयार करू शकलो आहोत. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामामुळे मोठे परिवर्तन झाले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
या बैठकी प्रसंगी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार शहाजी पाटील, आमदार राम सातपुते, आमदार सुभाष देशमुख, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजाभाऊ राऊत आमदार बबनराव शिंदे, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रांत अधिकारी मनीषा आव्हाळे आदी उपस्थित होते.


सोलापूरची विमानसेवा लवकर सुरू करावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी चिमणीला नोटीसदेखील दिली आहे. यावर कारवाई देखील लवकरच होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


मोदीजी वैश्विक नेता बनल्याने काही जणांच्या पोटात दुखतय – फडणवीस
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वैश्विक नेता झाले आहेत. त्यांचा सन्मान जगभर होत आहे. परंतु हा सन्मान होत असताना आपल्या देशातील काही जणांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत असेल तर त्याचे औषध माझ्याकडे नाही, असे खरमरीत वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सोलापूरला नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले असता त्याप्रसंगी केले. फडणवीस म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समवेत उद्धव ठाकरे व शरद पवार हे जात आहेत. परंतु केजरीवाल यांनी पवारसाहेब व ठाकरे यांच्याविषयी अनेक वेळा काय बोलले हे सर्वाना माहिती आहे. त्यामुळे मोदीविरुद्ध किती जरी एकत्र आले तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. कारण मोदी वर जनतेचा विश्वास आहे. विशेषतः परदेश दौरा करून नुकतेच मोदीजी देशामध्ये आले असता त्यांचा मान सन्मान परदेशात कसा होतो हे माहिती आहे, असेही फडणवीस म्हणाले.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!