– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य गजानन वायाळ यांच्या पाठपुराव्याला यश!
मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – मेरा बुद्रूक येथील जीर्ण झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे भाग्य अखेर उजळणार असून, ही इमारत शिकस्त करून नवीन इमारतीसाठी ३० लक्ष रूपयांचा निधी अखेर आमदार तथा माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेला आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य गजानन वायाळ यांनी विशेष पाठपुरावा केला होता. यापूर्वी या इमारतीसाठी आलेला निधी केवळ स्थानिक राजकारणातून व ती फाट्यावर घ्यायची की गावात, या वादातून परत गेला होता. आता हा निधी परत जाणार नाही, यासाठी स्थानिक नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
मेरा बुद्रूक गावाची लोकसंख्या दहा हजाराच्यावर असून येथे पशुधन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणूण दुग्ध व्यवसाय करतात. त्यासाठी अहमदनगर, पुणे, तर कुणी हरियाणावरून दूध व्यवसायसाठी गायी व म्हशी विकत आणल्या आहेत, तर काही शेतकरी शेळीपालनसुद्धा करतात. गावामध्ये त्यासाठी कायमस्वरूपी पशु वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत. परंतु उपचारासाठी व त्यांना बसण्यासाठी जी इमारत आहे. ती गेल्या अनेक वर्षापासून जीर्ण झालेली आहे. येथे नवी इमारत मिळावी, यासाठी मागील काही काळापासून मेरा बुद्रूकचे सरपंच सौ.अनिताताई वायाळ व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नाला यश येत शासनाकडून इमारत शिकस्त करण्याचे आदेशसुद्धा प्राप्त झाले आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती सौ.ज्योतीताई पडघान यांनी प्रयत्न करून ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु इमारत फाट्यावर घ्यायची की गावात यावर एकमत न झाल्याने निधी परत गेला होता.
मागील वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मेरा बुरूक ग्रामपंचायतचे सदस्य गजानन वायाळ यांनी आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे, इमारतीसाठी तीस लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे गावामध्ये पशुपालक शेतकरी बांधवांना पशुधनांच्या उपचारासाठी कोठेही जाण्याची यामुळे गरज पडणार नाही, व व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे, अशी माहिती मेरा बुद्रूकच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी ब्रेकिंग महाराष्ट्राशी बोलताना दिली.