Breaking newsHead lines

बारावीचा निकाल जाहीर; उत्तीर्णचा टक्का घसरला!

– राज्याचा निकाल ९१.२५ टक्के; कोकण विभाग अव्वल, पुणे दुसरे!

पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्पेâ घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा यंदाचा निकाल ९१.२५ टक्के इतका लागला असून, गेल्यावर्षीपेक्षा २.९७ टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. दिव्यांग श्रेणीत ९३ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. तर यंदादेखील या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली असून, मुलींचा निकाल हा ९३.७३ टाके लागला. तर मुलांचा निकाल हा ८९.१४ टक्के लागला आहे. नऊ विभागांमध्ये यंदा देखील कोकण विभागाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. अमरावती विभागाचा निकाल ९२.७५ टक्के इतका लागला असून, औरंगाबाद विभाग ९१.८५, नाशिक विभाग ९१.६६, लातूर विभाग ९०.३७, कोल्हापूर विभाग ९३.२८ टक्के इतका निकाल लागला आहे.

कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला असून, तो ८८.१३ टक्के इतका आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४.६९ टक्के अधिक आहे, त्यामुळे १२ वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेत यंदा १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. हाती आलेल्या निकालानुसार, राज्याचा निकाल ९१.२५ टक्के इतका लागला असून, १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा हा निकाल कमी लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल २.९७ टक्क्यांनी घटला आहे. तर दुसरीकडे, मुंबई विभागाचा निकालदेखील घसरला आहे. मुंबई विभागाचा निकाल ८८.१३ टक्के लागला असून, इतर विभागांमध्ये हा सर्वात कमी निकाल आहे. या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारत कमाल केली आहे. तर त्याखालोखाल पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि मुंबई विभागाने कामगिरी केली आहे.


बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९३.६९ टक्के इतका लागला असून, विभागात बुलढाणा जिल्हा दुसरा आला आहे. तर वाशिम जिल्हा ९५.४५ टक्के निकाल लागल्याने पहिला आला आहे. अमरावती विभागातून एक लाख ३८ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती, पैकी १ लाख २८ हजार ५२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यात ६४ हजार ३६४ इतकी मुलींची संख्या आहे. दरम्यान, जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या व पेपर फुटीप्रकरणी चर्चेत आलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील केंद्राचा निकालदेखील लागला असून, संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत मात्र बोर्डाने दिले आहेत.


कोकण विभागाचा सर्वाधिक ९६.०१ टक्के निकाल लागला. तर मुंबई विभागाचा सर्वात कमी ८८.१३ टक्के निकाल लागला आहे. निकालाच्या टक्केवारीत पुणे दुसर्‍या क्रमांकावर आहे. पुण्याचा ९३.३४ टक्के निकाल लागला आहे. धक्कादायक बाब अशी, की राज्यातील १७ महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी पास झालेला नाही. या महाविद्यालयांच्या विज्ञान शाखेतील एकही विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मे पासून ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जूनदरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका ५ जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.

यंदाची बारावीची परीक्षा १५४ विषयांसाठी घेण्यात आली. त्यात विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक शिक्षण हे विषय होतं. विज्ञानासाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या चार माध्यमातून तर अन्य शाखांसाठी या चार भाषांसह गुजराती व कन्नड अशा सहा भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. बारावी परीक्षेच्या १५४ विषयांपैकी २३ विषयांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.


बारावीचा निकाल कसा तपासाल?
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जा
  • HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाका
  • तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.
  • यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
  • विद्यार्थ्यांना ऑनलाईनच उत्तर पत्रिकाही काढून घेता येणार आहे.mahahsscboard.maharashtra.gov.in
    mahresult.nic.in

    या दोन संकेतस्थळावर इयत्ता बारावीचा निकाल पाहता येणार आहे. दरम्यान, परीक्षा मंडळाने बारावीच्या टॉपर्सची यादी काढणं बंद केलं आहे. त्यामुळे इयत्ता बारावीत कोण पहिलं आलं आणि कोण दुसरं आलं हे कळू शकणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!