पुणे (विशेष प्रतिनिधी) – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्पेâ घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (दि.२५) दुपारी ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील तब्बल १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी-विद्यार्थिनींना या निकालाची प्रतीक्षा लागून आहे. विद्यार्थ्यांना निकालाची गुणपत्रिका ५ जूनरोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्पेâ घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने पार पडल्या होत्या. आता उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मेपासून ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल, तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जूनदरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका ५ जूनरोजी महाविद्यालयात मिळणार आहे. उद्या दुपारी दोन वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.
यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत आणि दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या काळात घेण्यात आली. मागील दोन वर्ष कोरोना लॉकडाउनमुळे बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे.
कुठे पाहता येणार निकाल?
SMS द्वारे कसा पहाणार निकाल?
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.
ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी या स्टेप फॉलो करा
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.
महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार, निकाल घोषित करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. लवकरच निकाल घोषित करण्यात येईल. निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजिनल मार्कशीट कॉलेजमधून मिळून जातील.