संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखाना निवडणूक; सहा अर्ज ठरले अवैध
शेवगाव, जि.नगर (बाळासाहेब खेडकर) – संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १९ जागांसाठी एकूण ४९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी साहाय्यक निबंधक कार्यालयात छाननी झाली, त्यापैकी ४३ अर्ज वैध झाले तर ६ अर्ज अवैद्य झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली आहे.
बोधेगाव गटातून उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, बाळू फुंदे, अंबादास खेडकर सर्व वैध तर बाळासाहेब खेडकर यांचा अर्ज अवैध ठरला आहे. हातगाव गटातून विठ्ठल अभंग, भाऊसाहेब मुंडे, सुरेशचंद्र होळकर, अशोक तानवडे, चरणसिंग राजपूत, विठ्ठल बर्गे, अभंग अशोक, घाडगे हरीचंद्र सर्व वैध ठरलेत. मुंगी गटातून बापूराव घोडके, श्रीमंत गव्हाणे, रणजित घुगे सर्व वैध, तर लक्ष्मण टाकळकर, नवनाथ केदार, मारुती मोडके यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. चापडगाव गटातून शिवाजी जाधव, पांडूरंग काकडे, सदाशिव दराडे, सर्व वैध तर उत्तम आंधळे व कातकडे ज्ञानदेव यांचे अर्ज अवैध ठरलेत. हसनापूर गटातून ऋषिकेश प्रतापराव ढाकणे, माधव काटे, काशीनाथ चेमटे सर्व वैध तर उत्पादित सहकारी संस्था प्रतापराव बबनराव ढाकणे वैध, अनुसुचित जाती जमाती मतदासंघांतून सुखदेव खंडागळे, सुभाष खंडागळे सर्व वैध, महिला राखीवमधून विद्यमान संचालिका मिना संदिप बोडखे, सुमन मोहन दहिफळे, कमलबाई काशीनाथ चेमटे सर्व अर्ज वैध ठरले असून, इतर मागासर्गीय मतदासंघातून तुषार वैद्य, अशोक तानवडे सर्व वैध, भटक्या जाती जमाती मधून त्रिंबक चेमटे, उत्तम ढाकणे, काशीनाथ चेमटे, सतिश गव्हणे, रमेश केदार, बाळासाहेब खेडकर सर्व वैध ठरले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी मंडळ प्रयत्नशील आहे. दि. ६ जूनला माघार असून त्यानंतर चित्रं स्पष्ट होणार आहे.