बुलढाणा (संजय निकाळजे) – तथागत बहुउद्देशीय संस्था साकेगावद्वारा शासनाने परवानगी दिलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार, दि. २० मे रोजी साकेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अधिकारी वर्गांचीसुद्धा उपस्थिती लाभणार आहे.
याप्रसंगी सकाळी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने मानवंदना देण्यात येणार असून, सकाळी सात वाजता धम्म ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता भव्य मिरवणूक निघणार असून, दुपारी बारा वाजता अनावरण समारंभ होणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून आमदार श्वेता महाले चिखली विधानसभा ह्या राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ ह पी तुमोड, पोलीस अधीक्षक सुनील कडासने, आयआरएस अधिकारी अमित निकाळजे, एएसओ अधिकारी अमोल भटकर, आदींसह प्रमुख पाहुणे म्हणून रायपूर ठाणेदार राजवंत आठवले, तहसीलदार सुरेश कवळे, चिखली ठाणेदार भूषण गावंडे, एपीआय अलका निकाळजे, माजी सैनिक अजबराव निकाळजे, संजीव भटकर, अभिमन्यू निकाळजे, महाराष्ट्र पोलीस संघशील निकाळजे, सीआरपीएफ जवान बाळकृष्ण निकाळजे, निलेश निकाळजे, इंडियन आर्मी नितीन निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते गजानन अवसरमोल, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सुरडकर, चिखली शहराध्यक्ष बाळू भिसे, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे, आरपीआय युवा तालुकाध्यक्ष फकीरा निकाळजे, वंचितच्या जिल्हा नेत्या मालतीताई निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते रितेश पवार, उपसरपंच देविदास लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर निकाळजे, परमानंद निकाळजे, विजय निकाळजे, ग्रामसेवक सुभाष वीर, पत्रकार संजयनाथा निकाळजे, महेंद्र हिवाळे, रिपाइं जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोर्डे, माजी सभापती दिलीप जाधव आदींची उपस्थिती राहणार आहे.
तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक तथागत बहुउद्देशीय संस्था साकेगावच्यावतीने अध्यक्ष जितेंद्र निकाळजे, उपाध्यक्ष राहुल निकाळजे, सचिव श्रीकृष्ण निकाळजे, सहसचिव विजय निकाळजे, कोषाध्यक्ष पंजाबराव निकाळजे, सदस्य अशोक निकाळजे, प्रदीप निकाळजे, यांच्यासह इतर सदस्यांनी केले आहे.