बुलढाणा (खास प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस दलात एकाच वेळी मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत तसेच वेगवेगळ्या पोलीस कार्यालयात असलेल्या तब्बल १९२ पोलीस कर्मचार्यांच्या एकाचवेळी जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
बुलढाणा जिल्हा पोलीस अस्थापना मंडळाच्या १८ मेरोजी झालेल्या बैठकीत पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील पोलिसांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांनी जारी केला आहे. यामध्ये खामगाव शहर, शिवाजी नगर व ग्रामीण पो.स्टे.मधील कर्मचार्यांच्याही बदल्या झाल्या असून, त्यांच्या जागी नवीन पोलीस कर्मचारी येणार आहेत. बदल्या झालेल्या पोलीस कर्मचार्यांनी लवकरात लवकर आपल्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे आदेश देण्यात आले आहे.
प्रशासकीय बदल्यांचा आदेश येथे वाचा