Breaking newsHead linesMaharashtraMumbaiWorld update

दोन हजारांच्या नोटा बंद होणार!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – देशात पुन्हा एकदा नोंटबंदी लागू होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला असून, या नोटा व्यवहारातून मागे घेण्याचा निर्णय आरबीआयने आज जाहीर केला. २३ मे २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत या नोटा कोणत्याही बँकेतून बदलून मिळणार असून, एकावेळी फक्त जास्तीत जास्त २० हजार रुपयांच्याच चलनीमूल्यात म्हणजे १० नोटाच बदलून दिल्या जाणार आहेत. तथापि, बँक खात्यात या नोटा जमा करण्यासाठी मात्र कोणतीही मर्यादा नाही. कितीही नोटा ग्राहकांना आपल्या बँक खात्यात जमा करता येणार आहेत. नोव्हेंबर २०१६ मध्ये लागू करण्यात आलेल्या नोटाबंदीनंतर आरबीआयने ५०० व २००० रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. तर २०१८ पासून दोन हजार रूपयांच्या नोटांची छपाई आरबीआयने बंद केली होती. सद्या देशात ३१ मार्च २०२३ अखेर ३.६२ लाख इतक्या प्रमाणात दोन हजारांच्या नोटा असून, त्यांचे चलनीमूल्य १८१ कोटी रूपये इतके आहे. या सर्व नोटा आता चलनातून बाद करण्यात आल्या आहेत.२ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.  ३० सप्टेंबरपर्यंतच २ हजार रुपयांच्या नोटा चलनात असणार आहेत. बाजारातील सध्याच्या नोटा वैध असणार आहेत, असेदेखील आरबीआयने स्पष्ट केले आहे. २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत बँकांमध्ये नोटाबदली करता येणार आहेत.एकावेळी जास्तीत जास्त २० हजार रुपयांच्या नोटा बदली करता येणार आहेत. अप्रत्यक्षपणे २ हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आरबीआयच्या परिपत्रकानुसार, २ हजार रुपयांच्या नोटा तुमच्याबँकेत जाऊन जमा करता येतीलकिंवा या नोटांच्या बदल्यात दुसर्‍या नोटाही घेता येतील. २३ मे २०२३ पासून बँकेत जाऊन २ हजार रुपयांच्या नोटा बदलता येईल, पण एकावेळी फक्त २० हजार रुपयेच जमा करता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!